मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयात तब्बल ४४ टक्के अधिकारी, कर्मचारी वर्गाची कमतरता

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2021 11:51 AM2021-02-09T11:51:36+5:302021-02-09T11:52:32+5:30

Mira Bhayander - Vasai Virar Police News : ४ महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयात ४४ टक्के इतके पोलीस मनुष्यबळ कमी असल्याची माहिती राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी दिली आहे .

Mira Bhayander - Vasai Virar Police Commissionerate has a shortage of 44% officers and staff | मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयात तब्बल ४४ टक्के अधिकारी, कर्मचारी वर्गाची कमतरता

मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयात तब्बल ४४ टक्के अधिकारी, कर्मचारी वर्गाची कमतरता

googlenewsNext

मीरारोड - ४ महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयात ४४ टक्के इतके पोलीस मनुष्यबळ कमी असल्याची माहिती राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी दिली आहे . आयुक्तालय सुरु करण्यात खूप अडचणी असताना देखील आयुक्त सदानंद दाते यांनी गेल्या चार महिन्यात आयुक्तालय उत्तम रित्या सांभाळत चांगली घडी बसवली असल्याचे नगराळे म्हणाले .

१ ऑक्टोबर २०२० रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मीरा भाईंदर व वसई विरार पोलीस आयुक्तालयचे उदघाटन करण्यात आले होते. आयुक्तालयाच्या पहिल्या पोलीस आयुक्त पदी ज्येष्ठ सनदी अधिकारी सदानंद दाते यांची नियुक्ती करण्यात आली. अपुरे मनुष्यबळ , आयुक्तालय व नवीन पोलीस ठाणी , नवीन कार्यालये आदींसाठी लागणाऱ्या मूलभूत सुविधा पुरेशा नसताना देखील दाते यांनी आयुक्तालयाची घडी यशस्वी रित्या बसवण्यास घेतली आहे . नागरिकांच्या आयुक्तालया बद्दल असलेल्या अपेक्षा प्रमाणे कामकाज करून घेण्याचा प्रयत्न दाते यांनी चालवला आहे .

पोलीस आयुक्तालय झाले तरी मीरारोडच्या राम नगर येथील मुख्यालयाच्या इमारतीत नियंत्रण कक्ष व आयुक्तालयाचे संकेत स्थळ तयार करण्याचे काम सुरु होते . सोमवारी त्याचे उदघाटन महासंचालकांनी केले . आधुनिक नियंत्रण कक्ष असून जीपीएस यंत्रणे मुळे घटनास्थळी तात्काळ पोलीस मदत पाठवण्यास मदत होणार आहे.

नगराळे म्हणाले कि , कोणतेही पोलीस ठाणे चालवण्यासाठी कर्मचारी अधिकारी हवेत. आपल्या ह्या नव्या आयुक्तालयात ४४ टक्के कर्मचारी - अधिकारी कमी आहेत . रिक्त जागा जास्त आहेत . हि कमी भरून काढण्यासाठी सध्या ठाणे ग्रामीण व पालघर ग्रामीण मधून पोलीस बळ घेण्यासाठी अपर पोलीस आयुक्त एस. जयकुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे . समिती महिन्या भारत कार्यवाही पूर्ण करेल . तसेच भरती किंवा बदलीने येणारे इच्छुक असतील त्यांना सुद्धा प्राधान्याने सामावून घेऊ.

राज्यात पोलिसांची २० हजार पदे रिक्त आहेत . ती भरण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत . त्यात काही तांत्रिक अडचणी व न्याय प्रविष्ठ प्रकरण आहेत . पण लवकरच भरती पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे . नवीन आयुक्तालय , युनिट सुरु करताना नवीन कार्यालये - पोलीस ठाणे साठी जागा , अधिकाऱ्यांना बसण्यास जागा , मनुष्य बळ अश्या बऱ्याच अडचणी असतात .

आयुक्त सदानंद दाते यांनि गेल्या ४ महिन्यात आयुक्तालयाची चांगली प्रगती केली आहे . जोमाने काम सुरु आहे . आयुक्तालयाची सर्वच प्रक्रिया कार्यान्वित होईल . नवीन पोलीस ठाणी सुरु करण्याची तयारी सुरु आहे . आता पर्यंत काय काम झाले आहे याच आढावा आणि काय अडचणी आहे हे समजून घेण्यासाठी आलो आहे . महासंचालक कार्यालया कडून किंवा गृह विभागाच्या स्तरावर जास्तीत जास्त मदत लागेल ती लवकर देऊ असे नगराळे म्हणाले .

Web Title: Mira Bhayander - Vasai Virar Police Commissionerate has a shortage of 44% officers and staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.