Mira Road: पहिल्या पत्नी सोडून दुसरे लग्न करणाऱ्या नवरोबावर गुन्हा दाखल
By धीरज परब | Published: March 20, 2024 09:25 PM2024-03-20T21:25:18+5:302024-03-20T21:25:18+5:30
Mira Road Crime News: अनिदितो याने पत्नी सुदक्षिणा हिला सोडून जाण्याची धमकी देऊन तिला एकटीला सोडून गेला . तसेच फायदेशीर घटस्फोट न घेता त्याने परस्पर रीया बिश्वास नावाच्या महिले सोबत बेकायदा लग्न केले अशी फिर्याद सुदक्षिणा यांनी दिली .
मीरारोड - मीरारोडच्या बेव्हर्ली पार्क भागात राहणाऱ्या सुदक्षिणा यांचे लग्न २००३ सालात अनिदितो मंडल (४६ ) रा . मध्यपाडा, जिल्हा नदिया, पश्चिम बंगाल याच्याशी झाले होते. अनिदितो हा सुदक्षिणा यांनी केलेल्या स्वयंपाकाला नाव ठेवणे, घरात साफसफाई व्यवस्थित करत नाही सांगून टोमणे मारणे , आजारी असताना पत्नीस डॉक्टरकडे घेऊन न जाता दुर्लक्ष करणे, घरखर्चासाठी पैसे न देणे , बाहेरील लोकांसमोर त्यांना शिवीगाळ करून अपमान करणे , मारहाण करणे आदी प्रकारे शारीरिक व मानसिक तसेच आर्थिक छळ करत होता .
अनिदितो याने पत्नी सुदक्षिणा हिला सोडून जाण्याची धमकी देऊन तिला एकटीला सोडून गेला . तसेच फायदेशीर घटस्फोट न घेता त्याने परस्पर रीया बिश्वास नावाच्या महिले सोबत बेकायदा लग्न केले अशी फिर्याद सुदक्षिणा यांनी दिली . त्या फिर्यादीवरून १९ मार्च रोजी मीरारोड पोलिसांनी अनिदितो वर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील हे पुढील तपास करत आहेत.