Mira Road: भाजप महिला जिल्हाध्यक्षाच्या भावावर वीजचोरीचा गुन्हा दाखल
By धीरज परब | Published: July 24, 2024 09:21 PM2024-07-24T21:21:10+5:302024-07-24T21:21:43+5:30
Mira Road News: मीरा भाईंदर भाजपा महिला जिल्हाध्यक्षा यांच्या भावावर ५ लाख ४८ हजार रुपयांची वीज चोरी केल्याचा गुन्हा अदानी वीज कंपनीने दाखल केला आहे .
मीरारोड - मीरा भाईंदर भाजपा महिला जिल्हाध्यक्षा यांच्या भावावर ५ लाख ४८ हजार रुपयांची वीज चोरी केल्याचा गुन्हा अदानीवीज कंपनीने दाखल केला आहे . मीरा भाईंदर भाजपाच्या महिला जिल्हाध्यक्षा आणि माजी नगरसेविका अनिता पाटील ह्या मीरारोडच्या पेणकरपाडा येथे राहतात . त्याच भागात त्यांचा सख्खा भाऊ राजेश शामलाल चौहान हा शामल निवास येथे राहतो . चौहान ह्याने अदानीच्या विजेची चोरी चालवल्याची माहिती कंपनीला मिळाल्या नंतर कंपनीच्या पथकाने येऊन पाहणी केली . त्यात चौहान ह्याने वीज चोरी केल्याचे उघडकीस आले .
डिसेम्बर २०२१ ते १६ जुलै २०२४ दरम्यान राजेश चौहान ह्याने बेकायदा वीज जोडणी द्वारे २६ हजार ७५८ युनिटची वीज चोरी केली . त्याची दंडास रक्कम ५ लाख ४८ हजार रुपये इतकी आढळून आली . कंपनीचे तन्मय पाटील यांच्या फिर्यादी वरून काशीमीरा पोलिसांनी चौहान विरुद्ध भारतीय विद्युत अधिनियम २००३ नुसार गुन्हा दाखल केला आहे . वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विजय गंभीरराव हे करत आहेत.
राजेश चौहान ह्याने एका पत्रकारावर हल्ला केला होता त्याचा गुन्हा दाखल आहे . ह्या शिवाय सरकारी जागेत बेकायदा बांधकाम करण्या पासून विविध तक्रारी व गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत . परंतु राजकीय वरदहस्त असल्याने महापालिका आणि पोलीस हे चौहान वर ठोस कारवाई करत नाही तसेच त्याने सरकारी जमिनीवर केलेली बेकायदा बांधकाम , विक्री आदी प्रकरणी कारवाई करत नसल्याचा आरोप जागरूक नागरिकांनी केला आहे .