Mira Road: शेअर मार्केटमध्ये फायद्याचे आमिष दाखवून महिलेस ३८ लाख ४९ हजारांना गंडवले
By धीरज परब | Published: August 2, 2024 06:36 PM2024-08-02T18:36:39+5:302024-08-02T18:36:57+5:30
Mira Road Crme: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून भरपूर फायदा करून देण्याचे आम्हीच दाखवून मीरारोड मधील एका महिलेस सायबर लुटारूंनी ३८ लाख ४९ हजार रुपयांना फसवल्याची घटना घडली आहे.
मीरारोड - शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून भरपूर फायदा करून देण्याचे आम्हीच दाखवून मीरारोड मधील एका महिलेस सायबर लुटारूंनी ३८ लाख ४९ हजार रुपयांना फसवल्याची घटना घडली आहे.
मीरारोडच्या पूनम गार्डन येथील सॉलिटेर इमारतीत उमा विष्णू पांगम ह्या राहतात. त्यांना शिवानी अग्रवाल नावाने अनोळखी व्यक्तीने मोबाईल वरून संपर्क साधला . शेअर ट्रेडिंग मध्ये गुंतवणूक करून चांगला फायदा मिळवून देतो असे आमिष दाखवण्यात आले . पांगम यांच्याकडून एसएमसी फायनान्स ॲप डाऊनलोड करून घेतला व त्यात शेअर विकत घेण्याकरिता पैसे हवेत म्हणून पैसे भरण्यास सांगितले . त्यानुसार पांगम यांनी एकूण ३८ लाख ४९ हजार रुपये ऑनलाईन भरले.
परंतु शेअर ट्रेडिंग साठी गुंतवलेली मुद्दल व त्यावर मिळणारा फायदा पांगम यांना मिळालाच नाही . १७ जून ते २४ जुलै दरम्यान हा सर्व प्रकार घडला . आपली ऑनलाइन फसवणूक केली गेल्याची खात्री झाल्याने उमा यांनी मीरारोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे . मीरारोड पोलीस ठाण्यात १ ऑगस्ट रोजी शिवानी अग्रवाल नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.
अनोळखी व्यक्ती असून देखील लोकं त्यांच्यावर आंधळा विश्वास ठेऊन लाखो रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करून स्वतःची फसवणूक करून घेतात . पोलिसांनी सातत्याने आवाहन करून देखील आणि ओनलाईन फसवणुकीच्या घटना सतत घडून देखील चांगली सुशिक्षित लोकं आमिषाला बळी पडत असल्या बद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे .