Mira Road: आंतरमहाविद्यालयीन स्वच्छता लीगमध्ये अभिनव महाविद्यालय प्रथम  

By धीरज परब | Published: April 24, 2023 01:18 PM2023-04-24T13:18:51+5:302023-04-24T13:19:09+5:30

Mira Road: स्वच्छता लीग अर्थात सीपील २०२२ - २०२३ ह्या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत भाईंदरच्या अभिनव महाविद्यालयाने प्रथम , सायली महाविद्यालयाने द्वितीय तर अथर्व महाविद्यालयाने तृतीय क्रमांक मिळवला.

Mira Road: Abhinav Vidyalaya first in Inter-College Cleanliness League | Mira Road: आंतरमहाविद्यालयीन स्वच्छता लीगमध्ये अभिनव महाविद्यालय प्रथम  

Mira Road: आंतरमहाविद्यालयीन स्वच्छता लीगमध्ये अभिनव महाविद्यालय प्रथम  

googlenewsNext

मीरारोड - स्वच्छता लीग अर्थात सीपील २०२२ - २०२३ ह्या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत भाईंदरच्या अभिनव महाविद्यालयाने प्रथम , सायली महाविद्यालयाने द्वितीय तर अथर्व महाविद्यालयाने तृतीय क्रमांक मिळवला.

गेल्या तीन वर्षां पासून स्वच्छता मोहीम राबवणाऱ्या फॉर फ्युचर इंडिया संस्थेच्या वतीने यंदा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी स्वच्छता प्रीमियर लीग या स्पर्धेचे आयोजन मीरा भाईंदर महानगरपालिका, नारी सशक्तीकरण, करुळकर प्रतिष्ठान व बिमा मंडी यांच्या सहकार्याने केले होते . नोंव्हेबर २०२२ ते मार्च २०२३ या कालवधीत समुद्र व खाडी किनारी ३२ स्वच्छता मोहीम राबविल्या गेल्या.

या स्पर्धेत पाटकर वर्दे ,  भवन्स , शैलेंद्र , शंकर नारायण , लाडीदेवी रामधर , अभिनव ,  अथर्व , ठाकूर , डीटीएसएस , सह्याद्री , रॉयल , संत  रॉक्स , नालंदा , सायली , गोखले , के.ई.एस. श्रॉफ आदी महाविद्यालयातील सुमारे ५ हजार विद्यार्थी सहभागी झाले होते . समुद्रकिनारा व कांदळवन भागातून  सुमारे ११ हजार ५५० किलो प्लास्टिक आदी कचरा या विद्यार्थ्यांनी काढला.

भारतरत्न लता मंगेशकर सभागृह येथील पुरस्कार वितरण सोहळा मुंबई विद्यापीठ, एन. एन. एस. चे विशेष कर्तव्य अधिकारी सुशील शिंदे , करुळकर प्रतिष्ठानचे विवान करुळकर, संस्थेचे अध्यक्ष हर्षद ढगे, स्पर्धेचे समन्वयक ध्रुव कडारा यांच्या हस्ते करण्यात आला.

सर्वोत्कृष्ट कर्णधार म्हणून अथर्व कॉलेजची जीनल धुरी, डीटीएसएसच्या साक्षी गुप्ता हिने द्वितीय तर  तृतीय क्रमांक के. इ. एस. श्रॉफ कॉलेजच्या दक्ष जोगी व  लाडीदेवी कॉलेजचा सूरज गौतम यांनी पटकावला .  सर्वोत्कृष्ट सोशल मीडिया टीम श्रेणीत अथर्व कॉलेज आणि के. इ. एस. श्रॉफ महाविद्यालयाने बाजी मारली. यावेळी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या शिक्षकांचा तसेच महापालिकांचे स्वच्छता पथक , काही संघटना आदींचा देखील सत्कार करण्यात आला . 

Web Title: Mira Road: Abhinav Vidyalaya first in Inter-College Cleanliness League

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.