Mira Road: जबरी चोरीच्या गुन्ह्यात ५ वर्षांपासून फरार आरोपीला अटक
By धीरज परब | Published: March 23, 2024 10:06 PM2024-03-23T22:06:25+5:302024-03-23T22:08:00+5:30
Mira Road: एका इसमास मारहाण करून तिच्या कडील रोख व महत्वाची ओळ्खकार्ड बळजबरी लुटीच्या गुन्ह्यातील गेल्या ५ वर्षां पासून फरार असलेल्या आरोपीला काशीगाव पोलिसांनी अटक केली आहे .
मीरारोड - एका इसमास मारहाण करून तिच्या कडील रोख व महत्वाची ओळ्खकार्ड बळजबरी लुटीच्या गुन्ह्यातील गेल्या ५ वर्षां पासून फरार असलेल्या आरोपीला काशीगाव पोलिसांनी अटक केली आहे .
गुजरातच्या अहमदाबाद शहरातील स्वामी नारायण मंदिर जवळ आरती पॅलेस मध्ये राहणारे योगेशकुमार पटेल यांना मुबारक अली कमजुमा खान, अंकुश अनिलभाई अगरवाल, लल्लु यांनी वरसावे नाका येथील फाऊटन हॉटेल येथे बोलावून त्यांना मारहाण केली . त्यांच्या कडील ६० हजार रोख , पॅन कार्ड, आधार कार्ड जबरदस्तीने काढून घेतले. या प्रकरणी काशीमीरा पोलीस ठाण्यात १३ मार्च २०१९ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता .
मुबारक अली ( वय ४८ वर्ष ) रा जोगेश्वरी व अंकुश अगरवाल ( वय २४ वर्ष ) रा. शितल सोसायटी, गांधी चौक, नवापुर, नंदुरबार ह्या दोघांना मुद्देमालासह पोलिसांनी अटक केली होती . परंतु लल्लू हा मात्र पोलिसांना सापडला नव्हता .
परिमंडळ १ चे पोलीस उपआयुक्त प्रकाश गायकवाड यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे ऑल आऊट ऑपरेशन दरम्यान आरोपी नामे लल्लु हा निलकमल नाका बाजारात असल्याची बातमी गुप्त बातमीदार मार्फत काशीगाव पोलिसांना मिळाली . वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक माणिक पाटील, उपनिरीक्षक किरण बघदाणे सह ओमप्रकाश पाटील, राहुल वांळुज, प्रविण टोबरे, उमंग चौधरी, किरण विरकर यांच्या पथकाने परीसरात शोध घेत लल्लू ला गाठला असता तो पळून जावू लागल्याने त्याचा पाठलाग करून पकडले .
लल्लूचे खरे नाव सत्यनारायण राम कैलास पाल (वय ४४ वर्ष ) असून तो ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करत पखंदा आर.डी. रोड, बमन की पाडा जवळ, ओवळा, ठाणे येथे रहात होता . गेल्या ५ वर्षापासून तो पोलिसांना गुंगारा देत वावरत होता .