Mira Road: मीरारोडमध्ये बंदुकीचा धाक दाखवून सराफाला लुटण्याचा प्रयत्न

By धीरज परब | Published: May 27, 2023 11:39 PM2023-05-27T23:39:13+5:302023-05-27T23:39:38+5:30

Crime News: मीरारोड मध्ये एका सराफाला बंदुकीचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न दोघा लुटारूंनी केला . मात्र सराफाने धाडसाने त्यांचा प्रतिकार केल्याने लुटारू मोबाईल घेऊन पळून गेले . दरोड्याचा प्रयत्न झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

Mira Road: Attempt to rob Sarafa at gunpoint in Mira Road | Mira Road: मीरारोडमध्ये बंदुकीचा धाक दाखवून सराफाला लुटण्याचा प्रयत्न

Mira Road: मीरारोडमध्ये बंदुकीचा धाक दाखवून सराफाला लुटण्याचा प्रयत्न

googlenewsNext

- धीरज परब

मीरारोड - मीरारोड मध्ये एका सराफाला बंदुकीचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न दोघा लुटारूंनी केला . मात्र सराफाने धाडसाने त्यांचा प्रतिकार केल्याने लुटारू मोबाईल घेऊन पळून गेले . दरोड्याचा प्रयत्न झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

मीरारोडच्या विजय पार्क भागात मोहित कोठारी यांचे कोठारी ज्वेलर्स नावाने सराफा दुकान आहे . शनिवारी सायंकाळी कोठारी यांच्या दुकानात दोघे २० ते २५ वयोगटातील तरुण दागिना खरेदी करायचा म्हणून आले . दोघे दुकानात आले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर  रुमाल बांधलेला होता . त्यांनी जुनी अंगठी देऊन नवीन अंगठी खरेदी करायचे सांगितले.

कोठारी यांना त्यांचा संशय आल्याने त्यांनी दोघांना दुकाना बाहेर जाण्यास सांगितले . त्यावेळी एकाने बॅगेतून रिव्हॉल्वर काढून कोठारी यांच्यावर रोखले . आधीच सावध झालेल्या कोठारी यांनी त्वरित खाली वाकून खाली ठेवलेला रॉड काढला आणि दोघांवर हल्ला चढवला . कोठारी यांचा आक्रमक प्रतिकार पाहून दोघेही लुटारू पळून गेले . पळून जाताना त्यांनी कोठारी यांचा मोबाईल मात्र लुटून नेला . लुटारूं सोबतच्या झटापटीत कोठारी किरकोळ जखमी झाले आहेत.

सदर दरोड्याचा प्रयत्न दुकानातील सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून या प्रकरणी लुटारू हे दुचाकी वरून सिल्वर पार्कच्या दिशेने पळून गेले . घटनेचे गांभीर्य पाहून पोलीस उपायुक्त जयंत बजबळे , सहायक पोलीस आयुक्त विलास सानप आदींनी घटनास्थळी पाहणी करून लुटारूंना पकडण्यासाठी पथके रवाना केली आहेत . परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी पोलीस करत आहेत .

Web Title: Mira Road: Attempt to rob Sarafa at gunpoint in Mira Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.