मीरा रोडमध्ये हिरेचोरांचा पाठलाग करून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 05:53 AM2017-12-10T05:53:36+5:302017-12-10T05:53:46+5:30

बेस्ट प्रवाशाच्या खिशातून एक लाखांचे हिरे चोरून पळणा-या दोघा चोरट्यांना मीरा रोड पोलिसांनी अटक केली असली, तरी न्यायालयाकडून आरोपींची पोलीस कोठडी घेण्यात त्यांना यश आले नाही.

 In the Mira Road, chasing hirchoras and stuck out | मीरा रोडमध्ये हिरेचोरांचा पाठलाग करून अटक

मीरा रोडमध्ये हिरेचोरांचा पाठलाग करून अटक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : बेस्ट प्रवाशाच्या खिशातून एक लाखांचे हिरे चोरून पळणाºया दोघा चोरट्यांना मीरा रोड पोलिसांनी अटक केली असली, तरी न्यायालयाकडून आरोपींची पोलीस कोठडी घेण्यात त्यांना यश आले नाही. वाहतूक पोलिसांनी दोघा चोरट्यांना पकडले. मात्र, तिसरा आरोपी फिर्यादीची १८ हजारांची रोख रक्कम चोरून पळून गेला. त्याची नोंद पोलिसांनी घेतली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच ही हिºयांची पुडी देखील सापडली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मीरा रोडच्या कनकिया भागातील ‘नीळकंठ टॉवर’मध्ये राहणारे जिग्नेश मगनभाई पानसुरिया (३१) हे हिरे बाजारात नोकरी करतात. शुक्रवारी त्यांनी मॅकडोनाल्डजवळून बोरिवलीला जाणारी बेस्ट बस पकडली. बस सुरू होताच त्यांच्या मागेपुढे असलेल्या प्रवाशांच्या हालचालीवरून संशय आला. पुढच्या श्रीकांत जिचकार चौकातील सिग्नलवर बस थांबताच ते तिघे खाली उतरून पळू लागले.
जिग्नेश यांना आपल्या खिशातील एक लाखांच्या हिºयांची पुडी व रोख रक्कम चोरीस गेल्याचे लक्षात येताच तेही आरडाओरडा करत बसमधून खाली उतरून चोरट्यांच्या मागे पळू लागले. हे दृश्य पाहून तेथे हजर असलेले वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार मानसिंह कदम व शिपाई धनंजय गुजर यांनी दोघांना पकडले. तिसरा साथीदार मात्र पसार झाला.
मीरा रोड पोलिसांच्या ताब्यात दोघांना देण्यात आले. सहा. निरीक्षक प्रकाश पवार व त्यांच्या सहका-यांनी आरोपींची चौकशी केली असता त्यांची नावे जावेद अब्दुल गनी सुमरा (३६), रा. मोगरापाडा, अंधेरी वइजाज अहमद गुलामहुसेन शेख (६५), रा. बाजार रोड, बांद्रे पश्चिम अशी आहेत.

योग्य माहिती नाही

सूत्रांनी सांगितले की, १८ हजार व तिस-या साथीदाराची माहिती पोलिसांनी दिली असती, तर आरोपींना पोलीस कोठडी मिळून अन्य गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता होती.
सहा. पो.नि. प्रकाश पवार यांनी एक लाखांचे हिरे चोरीला गेले होते आणि आरोपी दोनच होते, असे सांगितले.

Web Title:  In the Mira Road, chasing hirchoras and stuck out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.