Mira Road: पोलीस आणि पालिकेच्या दुर्लक्षामुळे भरणी माफिया मुजोर, भर रस्त्यातच टाकत आहेत डेब्रिस - माती

By धीरज परब | Published: July 1, 2024 07:52 PM2024-07-01T19:52:55+5:302024-07-01T19:53:28+5:30

Mira Road News: मीरा भाईंदर शहरात भरणी माफिया यांचा धुमाकूळ प्रकरणी ठोस कारवाई  होत नसल्याने आता भरणी माफियांनी भर रस्त्यात डेब्रिस - माती आदी टाकणे सुरु केले आहे . त्यामुळे रस्ता अरुंद होऊन रहदारी व वाहतुकीला अडथळा होत अपघाताचा धोका वाढला आहे. 

Mira Road: Due to negligence of police and municipality, Bharni mafia is rampant, many are dumping debris on the road - soil | Mira Road: पोलीस आणि पालिकेच्या दुर्लक्षामुळे भरणी माफिया मुजोर, भर रस्त्यातच टाकत आहेत डेब्रिस - माती

Mira Road: पोलीस आणि पालिकेच्या दुर्लक्षामुळे भरणी माफिया मुजोर, भर रस्त्यातच टाकत आहेत डेब्रिस - माती

मीरारोड - मीरा भाईंदर शहरात भरणी माफिया यांचा धुमाकूळ प्रकरणी ठोस कारवाई  होत नसल्याने आता भरणी माफियांनी भर रस्त्यात डेब्रिस - माती आदी टाकणे सुरु केले आहे . त्यामुळे रस्ता अरुंद होऊन रहदारी व वाहतुकीला अडथळा होत अपघाताचा धोका वाढला आहे. 

डेब्रिसच्या बेकायदा वाहतूक आणि भराव करण्यास कायद्याने बंदी आहे . डेब्रिस वर कारवाईची महापालिकेची जबाबदारी आहे . तर गाळ , माती - दगड आदींची वाहतूक करण्यासाठी अधिकृत पात्र रॉयल्टी चलन लागते . शिवाय भराव करण्यास स्थानिक प्रशासनासह विविध विभागांची परवानगी पण घ्यावी लागते . डेब्रिस - दगड - माती आदींची विल्हेवाट लावण्यासाठी आवश्यक परवानग्या घेणे भाग असताना सर्रास बेकायदा वाहतूक आणि भराव केला जात आहे . 

डेब्रिस तसेच माती - दगड भराव टाकण्यासाठी पैसे मिळत असल्याने तसेच एखाद्याच्या जागेत भराव साठी सुद्धा पैसे घेतले जात असल्याने भरणी माफिया मोकाट आहेत . दिवसा ढवळ्या आणि रात्री - अपरात्री देखील पोलीस , पालिका , महसूल आदींच्या नाकावर टिच्चून भरणी माफिया हे डंपर द्वारे तसेच लहान टेम्पो द्वारे वाहतूक करून मनमानीपणे कुठेही भरणी करत आहेत . 

ह्या आधी राष्ट्रीय महामार्गावर घोडबंदर खिंड येथे तसेच घोडबंदर मार्गावर वरसावे नाका ते चेणे दरम्यान भर रस्त्यात व लगत भरणी माफियांनी डेब्रिस - दगड मातीचे बेकायदा भराव केले आहेत . त्यावर प्रशासनाने गुन्हे दाखल करण्यासह बेकायदा वाहतूक बंद न केल्याने भरणी माफियांनी आता घोडबंदर गाव ते वरसावे नाका ह्या काँक्रीट रस्त्यावर मोठ्या प्रमाणात भराव टाकून पळून जाण्याचा सपाटा लावला आहे . आधीच हा रस्ता अरुंद असून त्यात भरणी माफियांनी बेकायदा भराव केल्याने रस्त्यावर वाहतुकीला अडथळा होऊन अपघाताचा घोका वाढला आहे . 

शिवसेना ठाकरे गटाचे उपशहरप्रमुख राजू ठाकूर आणि विभाग प्रमुख विनोद म्हात्रे यांनी , ह्या भरणी माफियांना रोखा. त्यांच्या गाड्या जप्त करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करा . त्यांच्या गाड्यांचे परमिट व परवाने रद्द करा . घोडबंदर गाव रस्ता , महामार्गावरील घोडबंदर खिंड , घोडबंदर मार्गावर रस्त्यावर केलेले बेकायदा भराव पालिकेने हटवून होणारा खर्च ह्या भरणी माफियां कडून वसूल करावा . ह्या भागातल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करा . शहरात उघडपणे डेब्रिस आणि दगड - माती ची बेकायदा वाहतूक व बेकायदा भरणी रोखण्याची कारवाई करा .  अन्यथा नागरिकांसह आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला आहे . 

Web Title: Mira Road: Due to negligence of police and municipality, Bharni mafia is rampant, many are dumping debris on the road - soil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.