Mira Road: अंडरवर्ल्डशी संबंधित आंतरराज्य टोळी कडून ३२७ कोटी ६९ लाख रुपयांचे मेफेड्रोन हस्तगत

By धीरज परब | Published: July 3, 2024 07:36 PM2024-07-03T19:36:03+5:302024-07-03T19:36:16+5:30

Mira Road Crime News: अंडरवर्ल्डच्या कुख्यात गुंड दाऊदशी संबंधित अमली पदार्थ तस्करी प्रकरणी मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा १ ने देशातील विविध राज्यातून १५ जणांना अटक केली आहे .

Mira Road: Mephedrone worth Rs 327 crore 69 lakh seized from inter-state gang linked to underworld | Mira Road: अंडरवर्ल्डशी संबंधित आंतरराज्य टोळी कडून ३२७ कोटी ६९ लाख रुपयांचे मेफेड्रोन हस्तगत

Mira Road: अंडरवर्ल्डशी संबंधित आंतरराज्य टोळी कडून ३२७ कोटी ६९ लाख रुपयांचे मेफेड्रोन हस्तगत

 मीरारोड - अंडरवर्ल्डच्या कुख्यात गुंड दाऊदशी संबंधित अमली पदार्थ तस्करी प्रकरणी मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा १ ने देशातील विविध राज्यातून १५ जणांना अटक केली आहे . मेफेड्रोन बनवणारा कारखाना उद्धवस्त करण्यासह आरोपीं कडून ३२७ कोटी ६९ लाख ४३ हजार रू किंमतीचा  एम.डी. मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ हस्तगत केला आहे अशी माहिती पोलीस आयुक्त मधुकर पांडेय यांनी बुधवारी दिली .  . अमली पदार्थचा हा कला धंदा गुजरातच्या व्यापाऱ्या मार्फत दाऊदचा हस्तक करत असल्याचे उघडकीस आले आहे . 

मीरा भाईंदर गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने १५ मे रोजी मिळालेल्या माहिती नुसार घोडबंदर मार्गावर चेणे येथील द्वारका हॉटेल जवळ सापळा रचला . मीरा भाईंदर मध्ये एमडी हा अमली पदार्थ विक्री साठी आणला जाणार असल्याच्या माहिती वरून पोलिसांनी एका संशियत वाहना सह दोघांना तांब्यात घेतले . शोएब हनीफ मेमन  व निकोलस लिओफ्रेड टायटस ह्या वसईच्या दोघांची झडती घेतली असता बाजारभाव प्रमाणे  २ कोटी रु. किमतीचे १ किलो मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ मिळुन आला . त्यांच्यावर काशीगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन गुन्हे शाखेने त्यांची चौकशी सुरु केली . 

तपासामध्ये  शोएब याने दिलेल्या माहीती वरून पोलीस पथकाने तेलंगणा राज्यातील  दयानंद ऊर्फ दया माणिक मुद्दनार व  नासीर ऊर्फ बाबा जानेमियों शेख  रा . दोघीही हैद्राबाद यांना १७ मे रोजी राजेंद्रनगर, सायबराबाद येथून अटक केली . दयानंद शेट्टी ह्याने तर मेफेड्रोन बनविण्याची फॅक्टरी  जिल्हा विकाराबादच्या मंडळ मारपल्ली येथील नरसापुर मध्ये चालवली होती . पोलिसांनी तेथून २० लाख ६० हजार रू किमतीचे १०३ ग्रॅम मेफेड्रोन आणि २५ कोटींचे मेफेड्रोन बनवण्यासाठीचे रसायन व साहित्य सह २५ किलो कच्चे मेफेड्रोन जप्त केले आहे.

दयानंदच्या चौकशी नंतर घनश्याम रामराज सरोज रा. जौनपुर, उत्तरप्रदेश यास वाराणसी येथुन ताब्यात घेवुन अटक केली . तर मोहम्मद शकील मोहम्मद मोईन रा. हैद्राबाद, -तेलंगणा ह्याला मुंबईच्या गोरेगाव येथून अटक केली . त्यांच्या कडून कार सह १४ लाख ३८ हजार रू किमतीचे  ७१.९० ग्रॅम एमडी जप्त केले गेले . 

 भरत ऊर्फ बाबु सिध्देश्वर जाधव रा. वाशींद, शहापुर ह्याला गणेशपुरी मधून अटक केली . त्याच्याकडुन तो राहत असलेल्या पडघा येथील लाप बुद्रुक गावातील घरातून ५३ हजार रुपयांचे एम.डी बनविण्यासाठी लागणारे साहीत्य, व रसायने जप्त केली गेली . 

तपासामध्ये एम.डी बनविण्यासाठी लागणारे पैसे व एम डी विकुन मिळालेले पैसे याची देवाण घेवाण हि सलीम डोळा  रा . मुंबई हा करत होता . झुल्फीकार ऊर्फ मुर्तझा मोहसीन कोठारी हा गुजरातच्या  सुरत मधून मधून अमली पदार्थांची तस्करी , उत्पादन , पुरवठा करत होता . त्याला ३१ मे रोजी ताब्यात घेवुन त्यास सलीम डोळा याने पाठविलेले १० लाख ८४ हजार रुपये रोख हस्तगत केले आहेत . 

अमली पदार्थाची मोठी टोळी सक्रिय असलेले पोलिसांच्या निदर्शनास असून वाराणसी, महाराष्ट्र आणि गुजरात आदी भागात शोध मोहीम राबवून अमली पदार्थाची तस्करी करणारे बाबू खान, मोहम्मद खान आणि अहमद शाह ह्या तिघांना उत्तर प्रदेशातीत आजमगड येथून अटक केली गेली . 
२५ जुन रोजी आमिर खान, मोहम्मद शादाब आणि वीरेंद्र सिंग ह्यांना सुद्धा उत्तरप्रदेश च्या आजमगड मधून पकडले .  आमिर खान याने दिलेल्या माहिती वरून पोलिसांनी अभिषेक सिंह याला नालासोपारा भागातून पकडले . एकूण १५ आरोपीना अटक करण्यात आली असून दाऊदचा हस्तक सलीम डोळा हा व्यापारी झूल्फीकार कोठारी मार्फत व्यवहार करत असल्याचे समोर आले.  मुंबईच्या मुस्तफा फर्निचर वाला ह्या अंगडिया  मार्फत हवाल्याची रक्कम पाठवली जात असे . 

पोलीस आयुक्त मधुकर पांडे , अपर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक , उपायुक्त गुन्हे शाखा अविनाश अंबुरे , सहायक आयुक्त मदन बल्लाळ आदींच्या मार्गदर्शनाखाली  गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश कुऱ्हाडे व त्यांच्या पथकाने सदर कारवाई केली . 
 

Web Title: Mira Road: Mephedrone worth Rs 327 crore 69 lakh seized from inter-state gang linked to underworld

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.