मीरारोड पोलिसांनी मिळवून दिले ३० मोबाईल

By धीरज परब | Published: January 12, 2024 07:31 PM2024-01-12T19:31:52+5:302024-01-12T19:32:18+5:30

सदर मोबाईल हे मूळ मालकांना उपायुक्त जयंत बजबळे यांच्या हस्ते परत करण्यात आले. 

Mira Road police recovered 30 mobile phones | मीरारोड पोलिसांनी मिळवून दिले ३० मोबाईल

मीरारोड पोलिसांनी मिळवून दिले ३० मोबाईल

मीरारोड - मीरारोड पोलीस ठाणे हद्दीत विविध नागरिकांचे मोबाईल गहाळ झाल्याच्या तक्रारीं प्रकरणी पोलिसांनी केलेल्या तपासा नंतर ३० मोबाईल हस्तगत करून संबंधित नागरिकांना परत करण्यात आले आहेत. 

मीरारोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रवास करताना तसेच अन्यत्र मोबाईल गहाळ होण्याच्या घटना घडतात . मोबाईल गहाळ झाल्या बद्दल नागरिक पोलिसांच्या संकेतस्थळावर ऑनलाईन तक्रार करतात. आलेल्या तक्रारी नुसार मीरा भाईंदर परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त  जयंत बजबळे व सहायक आयुक्त महेश तरडे यांच्या मार्गदर्शनाखाली मीरारोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे, गुन्हे प्रकटीकरणचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पाटील , सहायक पोलिस निरीक्षक संतोष सांगवीकर व रामकृष्ण बोडके , उपनिरीक्षक किरण वंजारी सह प्रशांत महाले, प्रफुल्ल महाकुलकर, प्रदीप गाडेकर, बालाजी हरणे, परेश पाटील, तानाजी कौटे, शंकर शेळके, अथर्व देवरे यांच्या पथकाने हरवलेल्या मोबाईलचा तपास चालवला होता.  उपायुक्त कार्यालयातिल जयप्रकाश जाधव यांनी तांत्रिक मदत केली .  

हरवलेल्या मोबाईल फोनबाबत दूरसंचार विभागाचे नागरिक केंद्र यांच्या माध्यमातुन तसेच हरविलेल्या मोबाईलच्या आय. एम. ई. आय क्रमांकांचे तांत्रिक विश्लेषण करुन मोबाईल फोनचा शोध घेण्यात आला . सन २०२३ मध्ये मीरारोड पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास एकुण ३ लाख रुपयांचे ३० मोबाईल फोन हस्तगत करण्यात यश आले आहे. सदर मोबाईल हे मूळ मालकांना उपायुक्त जयंत बजबळे यांच्या हस्ते परत करण्यात आले . 

Web Title: Mira Road police recovered 30 mobile phones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.