परदेशातून उपचारासाठी आलेल्या माय-लेकीचे पैसे रिक्षात विसरलेले, पोलिसांनी मिळवून दिले

By धीरज परब | Published: August 26, 2023 07:31 PM2023-08-26T19:31:10+5:302023-08-26T19:31:20+5:30

टांझानिया वरून मीरारोड मध्ये उपचारासाठी आलेल्या आई व मुलीची २ हजार ४०० डॉलर असलेली बॅग रिक्षातच विसरली होती.

Mira Road police recovered the bag containing 2 thousand 400 dollars, which was left in the rickshaw | परदेशातून उपचारासाठी आलेल्या माय-लेकीचे पैसे रिक्षात विसरलेले, पोलिसांनी मिळवून दिले

परदेशातून उपचारासाठी आलेल्या माय-लेकीचे पैसे रिक्षात विसरलेले, पोलिसांनी मिळवून दिले

googlenewsNext

मीरारोड - टांझानिया वरून मीरारोड मध्ये उपचारासाठी आलेल्या आई व मुलीची २ हजार ४०० डॉलर असलेली बॅग रिक्षातच विसरली होती . रिक्षा चालकाने स्वतःहून बॅग आणून दिली नाहीच पण पोलिसांनी मात्र तात्काळ शोध घेऊन रिक्षा चालकाच्या घरातून डॉलर व मोबाईल असलेली बॅग हस्तगत करून माय -  लेकीस परत केली . 

नसरा मोहम्मद फक्री  यांना मेंदूशी निगडित आहार असल्याने त्यांना घेऊन त्यांची मुलगी शादिया सालू  (२०) हि टांझानिया वरून मीरारोड मध्ये आले होते . गुरुवारी रात्री त्यांनी मीरारोड रेल्वे स्थानक येथून रिक्षा पकडून हॉक्सटन हॉटेल मध्ये आल्या . उतरताना उपचार व खर्च साठी आणलेले २ हजार ४०० डॉलर , मोबाईल आणि सुमारे ५०० भारतीय रुपये असलेली बॅग रिक्षातच विसरल्या . 

बॅग विसरल्याचे कळताच त्यांनी परिसरात रिक्षाचा शोध घेतला मात्र काही सापडले नाही . शुक्रवारी त्यांनी मीरारोड पोलीस ठाण्यात जाऊन बॅग हरवल्याची कैफियत मांडल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांनी तात्काळ दखल घेत  हवालदार विलास गायकवाड व अन्य पोलिसाना त्या रिक्षाचा शोध घेण्यास सांगितले . 

गायकवाड यांनी सीसीटीव्ही वरून रिक्षाचा क्रमांक मिळवल्यावर त्या रिक्षाचा मालक हा विरार मध्ये राहणार उमर फारूक इर्शाद खान असल्याचे समजले . पोलिसांनी त्याला विरार मध्ये गाठले . त्यावेळी त्याने ती रिक्षा दुसऱ्याला चालवण्यास दिल्याचे सांगितले . पोलिसांनी दुसऱ्या कडे चौकशी केली असता त्याने रिक्षा तिसऱ्यालाच  म्हणजे काशीमीरा च्या मुन्शी कंपाउंड मध्ये राहणाऱ्या मोहम्मद खुददुस याला दिल्याचे सांगितले . 

गायकवाड व पथकाने शनिवारी मूळचा उत्तर प्रदेशचा असलेल्या मोहम्मद याला मीरारोड मध्ये रिक्षा वर असतानाच पकडून त्याला त्याच्या घरी नेले . तो रहात असलेल्या घरात पोलिसांना बॅग मिळून आली . त्यात २४०० डॉलर व मोबाइल तसाच होता . मात्र भारतीय चलनातील ५०० ते ६०० रुपये मोहम्मद याने खर्च करून टाकले होते . 

बॅग मिळताच वरिष्ठ निरीक्षक सरोदे यांनी त्या महिलांना बोलावून त्यांची डॉलर व मोबाईल असलेली बॅग परत केली . महिलांनी पैसे परत मिळाल्याचे पाहून आनंद व्यक्त करत पोलिसांचे आभार मानले . परंतु पैसे हरवल्याने त्यांनी उपचार न करताच परत जाण्याचा निर्णय घेत शनिवारची विमानाची तिकिटे काढली होती . आता सहा महिन्या नंतर त्या पुन्हा उपचारासाठी येणार आहेत . तर रिक्षा चालकाने वास्तविक ती बॅग त्या महिलांना सोडले त्या हॉटेलात येऊन वा पोलिसां कडे परत करणे आवश्यक होते . सुदैवाने त्याला बॅगेतील डॉलर हे नकली नोटा वाटल्याने त्या त्याने तश्याच ठेवल्या होत्या . 

Web Title: Mira Road police recovered the bag containing 2 thousand 400 dollars, which was left in the rickshaw

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.