Mira Road: सायबर गुन्हे रोखण्यासाठी आता पोलिसांची रिल्स स्पर्धे मार्फत जनजागृती

By धीरज परब | Published: November 4, 2023 09:23 PM2023-11-04T21:23:45+5:302023-11-04T21:24:11+5:30

Police: वाढते सायबर गुन्हे रोखण्यासाठी नागरिकां मध्ये जनजागृती करता पोलिसांनी इन्स्टाग्राम रिल्स स्पर्धेचे आयोजन केले आहे . तर सायबर शाखेला आता सायबर पोलीस ठाण्याचा दर्जा मिळाला असून त्याचे उदघाटन पोलीस आयुक्तांनी केले.

Mira Road: Public awareness through police's reels competition to prevent cyber crimes | Mira Road: सायबर गुन्हे रोखण्यासाठी आता पोलिसांची रिल्स स्पर्धे मार्फत जनजागृती

Mira Road: सायबर गुन्हे रोखण्यासाठी आता पोलिसांची रिल्स स्पर्धे मार्फत जनजागृती

मीरारोड - वाढते सायबर गुन्हे रोखण्यासाठी नागरिकां मध्ये जनजागृती करता पोलिसांनी इन्स्टाग्राम रिल्स स्पर्धेचे आयोजन केले आहे . तर सायबर शाखेला आता सायबर पोलीस ठाण्याचा दर्जा मिळाला असून त्याचे उदघाटन पोलीस आयुक्तांनी केले.

२०२१ साली मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या सायबर शाखेची सुरवात करण्यात आली होती . सायबर शाखे मार्फत लोकां सह विद्यार्थ्यां मध्ये सायबर गुन्ह्यां बाबत जनजागृती केली जाते . सायबर शाखेने आता पर्यंत अनेक गुन्हे उघडकीस आणून काहींना त्यांच्या फसवणुकीची रक्कम परत मिळवून दिली आहे.

परंतु अनेक नागरिकां कडून सायबर गुन्हे घडू नयेत म्हणून आवश्यक खबरदारी घेली जात नसल्याने सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढते आहे . त्यामुळे आत पोलिसांनी जनजागृती संदर्भात ‍इंस्टाग्राम रिल्स स्पर्धेचे आयोजन केले आहे . शनिवारी या स्पर्धेची घोषणा पोलीस आयुक्त मधुकर पांडेय यांनी केली.
 

इन्स्टाग्राम वर प्रसिद्ध असणाऱ्या साक्षी फडके व भावीन भानुशाली यांना यावेळी बोलावण्यात आले होते . साक्षी ही नवघर पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक फडके यांची मुलगी आहे.  सायबर रिल्स बनवणाऱ्या करता ही स्पर्धा आहे . स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येकास २ मिनिटाचा व्हिडियो बनवावा लागेल . सेफ बँकिंग, सोशल मीडिया, ऑनलाइन व यूपीआय सुरक्षितता आदी  विविध सायबर गुन्ह्याच्या मुद्द्यांवर रिल्स बनवायच्या आहेत . स्पर्धकांनी त्यांचे नामनिर्देशन WWW.reelscompitition. com या संकेतस्थळावर करायचे आहे.

त्यावर व्हिडियो बाबत सर्व नियम,अटी, शर्ती वेबसाईट वर उपलब्ध आहेत.वव्हिडियो बनवून पाठवण्या करता एक महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे. प्रथम बक्षीस २१ हजार ,दुसरे बक्षीस १५ ,तिसरे ११ हजार असे आहे. सायबर क्राईम फ्री सोसायटी बनवण्यासाठी  इन्स्टाग्राम इन्फ्लुएनसर यांना सोबत घेऊन जनजागृती करणार आहे.  स्पर्धेत जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे . यावेळी अपर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक , गुन्हे शाखा उपायुक्त अविनाश अंबुरे , निरीक्षक सुजितकुमार गुंजकर आदी उपस्थित होते.

कनकिया येथील पोलीस उपायुक्त इमारतीत असलेल्या सायबर शाखेचे आता सायबर पोलीस ठाणे मंजूर झाले असून त्याचे उदघाटन आयुक्तांनी केले . शासना कडून आवश्यक यंत्र सामुग्री , मनुष्यबळ मंजूर झाल्या नंतर त्यानुसार सायबर पोलीस ठाण्याच्या कामाची कक्षा वाढणार आहे . सायबर पोलीस ठाण्या कडे तांत्रिक कौशल्याची गरज असलेले मोठ्या स्वरूपाचे तसेच अन्य राज्य वा अन्य देशातले गुन्हे दिले जाणार आहेत .  

Web Title: Mira Road: Public awareness through police's reels competition to prevent cyber crimes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.