उत्तन समुद्रातील खुट्याची वाट दीपस्तंभाने उजळली; मच्छीमारांची अपघाताच्या धोक्यातून सुटका झाली 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 06:37 PM2021-05-27T18:37:36+5:302021-05-27T18:38:02+5:30

Miraroad News : भाईंदर पश्चिमेस उत्तन लगतच्या अरबी समुद्रात मासेमारी करून मच्छीमार हे किनाऱ्याला येण्यासाठीच्या मार्गालाखुट्याची वाट म्हणतात.

Miraroad News The lighthouse in uttan sea | उत्तन समुद्रातील खुट्याची वाट दीपस्तंभाने उजळली; मच्छीमारांची अपघाताच्या धोक्यातून सुटका झाली 

उत्तन समुद्रातील खुट्याची वाट दीपस्तंभाने उजळली; मच्छीमारांची अपघाताच्या धोक्यातून सुटका झाली 

Next

मीरारोड - उत्तन समुद्रातील खुट्याची वाट आता दीपस्तंभाच्या प्रकाशाने उजळली आहे. समुद्रात उभारलेल्या या दीपस्तंभाचे लोकार्पण खासदार राजन विचारे यांच्या हस्ते करण्यात आले. दीपस्तंभ नसल्याने परतणाऱ्या मच्छीमारांना येथील खडकांवर बोट आदळून नुकसान सहन करावे लागत होते. भाईंदर पश्चिमेस उत्तन लगतच्या अरबी समुद्रात मासेमारी करून मच्छीमार हे किनाऱ्याला येण्यासाठीच्या मार्गालाखुट्याची वाट म्हणतात. वाटेने येताना आजूबाजूचे खडक काळजीपूर्वक बोट किनारी आणावी लागते. परंतु रात्रीच्या वेळी मात्र हे खडक समजत नसल्याने मच्छीमार बोटींना अपघात होऊन नुकसान होत असे. अनेक वर्षां पूर्वी येथे असणारा दीपस्तंभ हा कोसळल्याने मच्छीमारांना खूपच काळजीपूर्वक येथून रात्रीच्या वेळी वाट काढावी लागत असे.

स्थानिक मच्छीमारांचा खुट्याच्या वाटेतील हा जीवघेणा प्रवास पाहता राजन विचारे यांनी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे जुलै २०१९ मध्ये दीपस्तंभासाठी मागणी केली. कामासाठी ५६ लाखांच्या खर्चाची मंजुरी मेरिटाईम बोर्डाला मिळवून दिली. परंतु भर समुद्रात या ठिकाणी काम करण्याकरिता तांत्रिक अडचणी होत्या तसेच मंजूर निधी कमी पडत असल्याने काम सुरु झाले नाही. विचारे यांनी पुन्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे व जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करून आणखी १६ लाखांचा निधी मंजूर करून घेतला. एकूण ७२ लाखांचा निधी उपलब्ध झाल्यावर अप्पर मुख्य सचिव आशिष कुमार सिंग यांच्याकडे बैठक बोलावून मेरीटाईम बोर्ड कडून हे काम लवकर पूर्ण करावे असा आग्रह धरला होता.

 

सदर कामाचे भूमिपूजन १५ मार्च २०२१ रोजी झाल्यावर दोन महिन्यात हे काम पूर्ण करण्यात आले. बुधवारी ह्या दीपस्तंभाचे लोकार्पण विचारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार गीता जैन, मच्छीमार नेते बर्नड डिमेलो, विरोधीपक्ष नेते प्रवीण पाटील, गटनेत्या नीलम ढवण, उपजिल्हा प्रमुख राजू भोईर, नगरसेवक एलियस बांड्या, हेलन जॉर्जी गोविंद, शर्मिला बगाजी, माजी नगरसेवक जॉर्जी गोविंद, उपशहर संघटक तेजस्वी पाटील, उप शहर प्रमुख केशीनाथ पाटील, अशोक मोरे सह मेरिटाइम बोर्डाचे अभियंता शेलार, अपर तहसीलदार नंदकुमार देशमुख आदी उपस्थित होते. 

अंधार होताच दीपस्तंभ उजळणार आहे. जेणे करून काळोखात खडकांपासून बोट वाचवून ती सुखरूप आणता येणार आहे. उत्तन परिसरात मच्छीमारांसाठी नवीन मच्छी मार्केट, बर्फ कारखाना, कोल्ड स्टोरेज उभारण्या बरोबरच मच्छिमारांना पालघर येथील मत्स्यव्यवसाय विभागाच्या कार्यालयात जावे लागत असल्याने त्यांची गैरसोय दूर व्हावी यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाचे कार्यालय उत्तन येथे सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे राजन विचारे यांनी सांगितले.
 

Web Title: Miraroad News The lighthouse in uttan sea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.