वृक्ष प्राधिकरण विभागाचा गलथान कारभार
By अजित मांडके | Published: June 24, 2024 04:48 PM2024-06-24T16:48:34+5:302024-06-24T16:49:13+5:30
ठाणे महानगरपालिकेचे स्वत:चे वृक्ष प्राधिकरण विभाग व उद्यान विभाग असून या ठिकाणी त्या क्षेत्राशी संबंधीत अधिकारी बसलेले आहेत.
ठाणे :ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाच्या गलथान कारभाराचा फटका पहिल्याच पावसात ठाणेकरांना सहन करावा लागल्याची गंभीर बाब समोर आली आहे. पावसाळ्या पूर्वी झाडांच्या फांद्या तोडण्यात आल्याचा दावा वृक्ष प्राधिकरण विभागाने केला होता. मात्र प्रत्यक्षात ज्या ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले, त्याठिकाणी वृक्षांची छाटणी ही योग्य प्रकारे झालीच नसल्याचे दिसून आल्याची माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
ठाणे महानगरपालिकेचे स्वत:चे वृक्ष प्राधिकरण विभाग व उद्यान विभाग असून या ठिकाणी त्या क्षेत्राशी संबंधीत अधिकारी बसलेले आहेत. असे असतानाही गेल्या आठवड्यामध्ये पावसाच्या पहिल्याच तडाख्याने शहरातील अनेक झाडे उन्मळून पडली तर काही ठिकाणी अपघात झाले असून, काही ठिकाणी वाहनांचे नुकसान झाल्याच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. शहराच्या विविध भागात वृक्ष उन्मळून पडलेले असतांना डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहासमोरील रस्त्यावरून बेथनी हॉस्पिटलकडे ८ ते ९ मोठ-मोठी झाडे कोसळली होती. शुक्रवारी रात्री झालेल्या पावसात शहरात १०० हून अधिक वृक्ष उन्मळून पडल्याचे दिसून आले आहे. या वृक्षांची पाहणी केली असता, या सर्व झाडांच्या फाद्यांची छाटणी पावसाळ्यापुर्वी योग्य प्रकारे न झाल्याने त्या फाद्यांचे वजन व सोसाट्याच्या वाºयामुळे ही सर्व झाडे उन्मळून पडल्याचे दिसून आले आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण व उद्यान विभागाच्या अधिकाºयांच्या गलथान कारभारामुळे नागरिकांना या घटनाना सामोरे जावे लागत आहे. पहिल्याच पावसामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात झाडे उन्मळून पडली असली तरी सुदैवाने कोणतीही मोठी घटना घडलेली नाही. पुढील तीन महिन्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याने झाडांच्या फाद्यांची छाटणी योग्य प्रकारे करण्यासंदर्भात संबंधितांना निर्देश द्यावेत तसेच आपल्या जबाबदारीची जाणीव न ठेवता नागरिकांच्या जिवाशी खेळणाºया अधिकारी, कर्मचाºयांवर कडक कारवाई करावी अशी मागणी सरनाईक यांनी एका पत्राद्वारे महापालिका आयुक्त सौरभ राभ यांच्याकडे केली आहे.