बेपत्ता अल्पवयीन मुलीचा ठाणे गुन्हे शाखेने लावला तासाभरात छडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 12:11 AM2020-12-04T00:11:24+5:302020-12-04T00:18:20+5:30
नववीमध्ये कमी गुण मिळाल्यामुळे आई वडिल रागावण्याची धास्ती असलेल्या १५ वर्षीय विद्यार्थीनीने अचानक घर सोडले. याप्रकरणी अपहरणाची तक्रार दाखल झाल्यानंतर ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट ५ च्या पथकाने अवघ्या तासाभरातच मोठया कौशल्याने भिवंडीतून तिचा शोध घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : पोखरण रोड क्र मांक-२, लोकपुरम येथून बेपत्ता झालेल्या १५ वर्षीय मुलीचा अवघ्या तासाभरातच शोध घेण्यात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-५ च्या पथकाला बुधवारी यश आले. नववीमध्ये कमी गुण मिळाल्यामुळे आई -र् वडील रागावतील, या धास्तीपोटी तिने घरातून पळ काढला होता. याप्रकरणी तिच्या पालकांनी चितळसर पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्र ार दाखल केली होती.
ठाण्यातील लोकपुरम भागातील ही विद्यार्थिनी घरातून निघून गेल्याची तक्र ार तिच्या पालकांनी चितळसर पोलीस ठाण्यात २ डिसेंबर रोजी दाखल केली. ती सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घरातून गेल्यानंतर रात्री ९ वाजण्याच्या सुमारास याप्रकरणी अपहरणाची तक्र ार तिच्या पालकांनी दाखल केली. ही माहिती मिळताच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे वागळे इस्टेट युनिट-५ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांच्या पथकाने भिवंडीतील साईबाबा मंदिर परिसरातून तिचा शोध घेतला. नववीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने घरातील रागावतील, या धास्तीने घरातील कोणालाही न सांगता भिवंडीतील मैत्रिणीकडे गेल्याचे चौकशीमध्ये तिने पोलिसांना सांगितले. ती ज्या ठिकाणी मिळाली, तिथे तिचे इतरही मित्रमैत्रिणी जमले होते. विश्वासात घेऊन तिला पोलिसांनी सुखरूप पालकांच्या स्वाधीन केले.
परीक्षेतील गुण हेच सर्वकाही नाही. मुलांच्या इतरही कलागुणांकडे लक्ष देऊन त्यादृष्टीने त्यांचा विकास करता येऊ शकतो. मुलांना कमी गुण मिळाल्यानंतर ते अशा प्रकारे दडपणाखाली येणार नाहीत, याचीही काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
सहायक पोलीस आयुक्त किसन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक घोडके, सहायक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे, हवालदार विजयकुमार गो-हे, राजेश क्षित्रय, सागर सुरळकर आण िपोलीस नाईक कल्पना तावरे आदींच्या पथकाने ही कामिगरी केली.