उल्हासनगरात झाडासाठी मिस्ट फॉगर मशीन ठरली वरदान; धुळीवर पाणी फवारणी व झाडांना पाणी
By सदानंद नाईक | Updated: March 17, 2025 16:12 IST2025-03-17T16:12:47+5:302025-03-17T16:12:56+5:30
विकास कामामुळे शहरात निर्माण झालेल्या धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला.

उल्हासनगरात झाडासाठी मिस्ट फॉगर मशीन ठरली वरदान; धुळीवर पाणी फवारणी व झाडांना पाणी
सदानंद नाईक
उल्हासनगर : विकास कामामुळे शहरात निर्माण झालेल्या धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. यावर उपाय म्हणून महापालिकेने धुळीवर पाणी फवारणीसाठी दोन मिस्ट फॉगर मशीन खरेदी केल्या असून मशीनकडून झाडांना पाणी व झाडे धुण्याचे काम केले जाते. फॉगर मशीन टू इन वनचे काम करीत असल्याने, हजारो झाडांना जीवदान मिळाल्याची माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली.
उल्हासनगरात ४२३ कोटीची भुयारी गटार योजना, १०३ कोटीची पाणी वितरण योजना, एमएमआरडीए अंतर्गत १५० कोटीच्या निधीतून मुख्य ७ रस्त्याचे काम असी असंख्य विकास कामे सुरु आहे. या विकास कामामुळे शहरांत सर्वत्र धुळीचे साम्राज्य निर्माण झाली असून धुळीवर फवारणी मारण्यासाठी महापालिकेने दोन मिस्ट फॉगर मशीन खरेदी केल्या आहेत.
या फॉगर मशीन रस्त्यावर पाणी फवारणी करण्याचे काम करीत होती. मात्र गेल्या काही महिन्यापासून मिस्ट फॉगर मशीनकडून रस्त्याच्या डिव्हायडर मधील झाडांना पाणी देणे. रस्त्या शेजारील व रस्ता डिव्हायडर मधील झाडे धुणे आदी कामेही मशीनकडून करून घेतली जात आहे. एकीकडे प्रचंड प्रमाणात असलेल्या धुळीवर फवारणी करण्या ऐवजी झाडांना पाणी देणे, झाडे धुण्याचे काम मशीनकडून केले जात असल्याने, पालिका कारभारावर टीका होत आहे.
मशीनचे टू इन वनचे काम
मिस्ट फॉगर मशीन शहरातील धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी खरेदी केली. प्रत्यक्षात मशीनकडून रस्ता दिव्हायडर मधील झाडांना पाणी देणे व रस्ता लगतची झाडें धुणे असे टू इन वनचे काम करीत असल्याची प्रतिक्रिया परिवहन विभागाचे प्रमुख विनोद केणी यांनी दिली.
हजारो झाडांना जीवदान
महापालिकेने शहर हरित व स्वच्छ दिसण्यासाठी रस्त्या लगत व रस्ता डीव्हायडर मध्ये हजारो झाडाची लागवड पावसाळ्यात लाखो रुपये खर्चून केले. मात्र झाडांना वेळेत पाणी न मिळाल्याने हजारो झाडें पाण्या अभावी जळून गेली. अश्या झाडांना जीवदान देण्यासाठी मिस्ट फॉगर मशीनचा उपयोग केला जात आहे.
झाडे जगाविण्याचे काम कोणाचे?
महापालिकेने लाखो रुपये खर्जून हजारो झाडे शहरातील विविध ठिकाणी लावण्यात आली. झाडांना वेळीच पाणी दिला नसल्याने, पाण्या अभावी हजारो झाडे मरून गेली. याला जबाबदार कोण? असा प्रश्न मनसे कामगार संघटनेचे अध्यक्ष दिलीप थोरात यांनी महापालिका आयुक्ताना करून कारवाईची मागणी केली.