मिताली म्हात्रेचा अष्टपैलू खेळ, चौथी अर्जुन मढवी स्मृती महिला टी २० लीग क्रिकेट स्पर्धा
By प्रज्ञा म्हात्रे | Published: December 4, 2023 04:50 PM2023-12-04T16:50:04+5:302023-12-04T16:50:21+5:30
सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या दैवेज्ञ क्रिकेट क्लबला २० षटकात ८ बाद ८५ अशी मजल मारता आली.
ठाणे : मिताली म्हात्रेच्या अष्टपैलू खेळामुळे गटविजेते दिलीप वेंगसरकर फाऊंडेशन संघाने यजमान दैवेज्ञ क्रिकेट क्लबचा आठ विकेट्सनी पराभव करत डॉ राजेश मढवी स्पोर्ट्स असोसिएशन आणि दैवेज्ञ क्रिकेट क्लब आयोजित अर्जुन मढवी स्मृती महिला टी २० लीग क्रिकेट स्पर्धेत विजयाचे खाते खोलले.
सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या दैवेज्ञ क्रिकेट क्लबला २० षटकात ८ बाद ८५ अशी मजल मारता आली.या धावसंख्येत ३५ अवांतर धावांचा वाटा होता. गौरी बाजीराव (२४) आणि जागृती भोईचा (११) अपवाद वगळता त्यांच्या एकाही फलंदाजाला दोन आकडी धावा करता आल्या नाहीत. दृष्टी राणे आणि प्रज्ञा भगतने प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले. दिलीप वेंगसरकर फाऊंडेशन संघाने १२ व्या षटकात एका फलंदाजांच्या मोबदल्यात ८६ धावा करत विजयाचे लक्ष्य पार केले. एक बळी आणि नाबाद २७ धावा करणाऱ्या मिताली म्हात्रेला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
संक्षिप्त धावफलक :
दैवेज्ञ क्रिकेट क्लब : २० षटकात ८ बाद ८५ ( गौरी बाजीराव २४, जागृती भोई ११, दृष्टी राणे ४-१६-२, प्रज्ञा भगत २-१०-२, मिताली म्हात्रे ४-९-१, प्राप्ती निबडे ३-१५-१) पराभूत विरुद्ध दिलीप वेंगसरकर फाऊंडेशन : ११.४ षटकात १ बाद ८६ (शाहीन रझाक नाबाद ३५, मिताली म्हात्रे नाबाद २७). सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू - मिताली म्हात्रे