आमदार आयलानी यांच्या मुलाची १ कोटी ६० लाखाने फसवणूक, दोघांवर गुन्हा दाखल
By सदानंद नाईक | Published: April 13, 2023 04:27 PM2023-04-13T16:27:57+5:302023-04-13T16:28:40+5:30
याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात दोघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदानंद नाईक, उल्हासनगर : आमदार कुमार आयलानी यांचा मुलगा धिरज आयलानी एका कंपनीत ३३ टक्के भागीदारी व्यवसाय असतांना त्यांच्या इतर साथीदारांनी परस्पर सदनिका विकून १ कोटी ६० लाखाची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात दोघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-३ येथील शांतीनगर येथील गृहनिर्माण मोनार्च सॉलिटेअर या एलएलपी कंपनीत आमदार कुमार आयलानी यांचा मुलगा धीरज आयलानी यांनीं ३३ टक्के शेअर प्रमाणे भागभांडवल गुंतवणूक केली आहे. भागीदारी व्यवसाय बाबत व एमओयु प्रमाणे साथीदार भागीदारांनी बांधकाम केलेल्या इमारती मधील काहीं सदनिका धीरज आयलानी यांची संमती विना १६ फेब्रुवारी २०१३ ते २ फेब्रुवारी २०२३ दरम्यान परस्पर विक्री करून ग्राहकाकडून चेक व रोख रक्कमद्वारे अशी एकून १ कोटी ६० लाख घेऊन अपहार केला. यामध्ये धीरज आयलानी यांच्यासह ज्यांनी सदनिका घेतली त्या ग्राहकांची फसवणूक झाल्याचे उघड झाले.
आमदार कुमार आयलानी यांचा मुलगा धीरज आयलानी यांच्या तक्रारीनुसार मध्यवर्ती पोलीस ठाण्यात हसमुख ठाकुर गोपाळ ठाकूर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड अधिक तपास करीत आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"