आमदार समिती गुरुवारी पालघरात
By admin | Published: January 3, 2017 05:31 AM2017-01-03T05:31:04+5:302017-01-03T05:31:04+5:30
शासकीय आश्रमशाळा व वसतीगृहातील मुलीवर झालेल्या अत्याचाराची सखोल चौकशी करणाऱ्या महिला आमदारांची समिती ५ व ६ जानेवारी रोजी पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे.
पालघर : शासकीय आश्रमशाळा व वसतीगृहातील मुलीवर झालेल्या अत्याचाराची सखोल चौकशी करणाऱ्या महिला आमदारांची समिती ५ व ६ जानेवारी रोजी पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे.
प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, डहाणू व जव्हार येथील आदिवासी क्षेत्रांतर्गत येत असलेल्या शासकीय आश्रमशाळा, वसतीगृहातील मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तसेच तेथे राहणाऱ्या मुलींना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांबाबत आश्रमशाळांना भेटी देऊन संबंधित अधिकाऱ्यांसमवेत ही समिती बैठक घेणार आहे.
५ जानेवारी रोजी सकाळी ११ ते दु. २ वा. डहाणू प्रकल्प क्षेत्रातील शासकीय आश्रमशाळांना, वसतीगृहांना भेटी व संबंधित अधिकाऱ्यांसमवेत चर्चा दुपारी ३ ते ५ वा. उर्वरित आश्रमशाळांना भेटी व शासकीय आश्रमशाळेत आढळून आलेल्या त्रुटी संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांसमवेत ही समिती चर्चा करणार आहे. सायंकाळी ५ वा जव्हार प्रकल्प कार्यालयात पोहचून ६ जानेवारी सकाळी ९ ते दु. २ वा जव्हार प्रकल्प कार्यक्षेत्रातंर्गत येत असलेल्या आश्रमशाळा, वसतीगृहांना भेटी व संबंधित अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करणार आहेत.
या दौऱ्यात महिला व बालविकास राज्यमंत्री तथा समिती प्रमुख, विद्या ठाकूर, अमिता चव्हाण, निर्मला गावित, सीमा हिरे, दीपिका चव्हाण, संगिता ठोंबर, तृप्ती सावंत, मनीषा चौधरी, सुमनताई पाटील, नीलम गोऱ्हे, स्मिता वाघ, विद्या चव्हाण आदि सहभागी होणार आहेत. (प्रतिनिधी)