आमदार गोळीबार प्रकरण गोळीबारातील दोन रिव्हॉल्वर फॉरेन्सिक लॅबकडे
By सदानंद नाईक | Published: February 6, 2024 05:45 PM2024-02-06T17:45:10+5:302024-02-06T17:45:29+5:30
उल्हासनगरातील हिललाईन पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये २ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता गोळीबारीचा प्रकार घडला आहे.
उल्हासनगर : हिललाईन पोलीस ठाण्यात आमदार गणपत गायकवाड व हर्षल केणे यांनी एकून १० राऊंड फायर केल्याचे उघड झाले. जप्त केलेल्या दोन रिव्हॉल्वर व फायर केलेल्या गोळ्या फॉरेन्सिक लॅबकडे तपासासाठी पाठविणार असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त शिवाजी पाटील यांनी दिली आहे.
उल्हासनगरातील हिललाईन पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये २ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता गोळीबारीचा प्रकार घडला आहे. भाजपचे आमदार गणपत गायकवाड व त्यांचे खाजगी सुरक्षारक्षक हर्षल केणे यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण पूर्वचे शहरप्रमुख महेश गायकवाड व राहुल पाटील यांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये एकून १० राऊंड फायर होऊन, गोळीबारात जखमी झालेले महेश गायकवाड यांच्या अंगातून ६ तर राहुल पाटील यांच्या अंगातून २ गोळ्या रुग्णालयात शस्त्रक्रियाद्वारे बाहेर काढल्या आहेत. तर फायर केलेल्या दोन गोळ्या भिंतीवर लागल्या होत्या.
आमदार गणपत गायकवाड व हर्षल केणे यांच्याकडून जप्त केलेल्या रिव्हॉल्वर व फायर झालेल्या गोळ्याची तपासणी फॉरेन्सिक लॅबद्वारे होणार आहेत. गायकवाड व केणे यांच्या अंगातून काढलेल्या गोळ्या आमदार गणपत गायकवाड व हर्षल केणे यांच्या रिव्हॉल्वर मधून निघाले का? यांची तपासणी फॉरेन्सिक लॅब मध्ये होणार असल्याची माहिती ठाणे क्राईम ब्रँचचे उपायुक्त शिवाजी पाटील यांनी दिली आहे. आमदार गणपत गायकवाड यांना सुरक्षेच्या कारणास्तव हिललाईन ऐवजी कळवा पोलीस ठाण्यात ठेवून तपास ठाणे क्राईम ब्रँच करीत आहेत. सोमवारी दिवसभर क्राईम ब्रँचच्या पथकाने तपासासाठी हिललाईन पोलीस ठाण्यात ठाण मांडले होते. तसेच पोलीस ठाण्याच्या प्रांगणातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून धिंगाणा घालणाऱ्या दोन्ही गटाच्या समर्थकांची पोलिस ओळ्खपरेड सुरू करणार आहेत. क्राईम ब्रँचच्या या ओळ्खपरेडने दोन्ही गायकवाड समर्थकात भीती निर्माण होईन त्यातील अनेकजण भूमिगत झाले आहे.
नादुरुस्त कॅमेऱ्याची दुरुस्ती
हिललाईन पोलीस ठाण्यातील प्रांगणातील काही सीसीटीव्ही कॅमेरे नादुरुस्त असल्याने, महत्वाचे रेकोर्ड झाला नाही. त्या बंद कॅमेऱ्याची दुरुस्ती मंगळवारी करण्यात आली. गोळबाराच्या दिवसी पोलीस प्रांगणात गर्दी केलेल्या दोन्ही गायकवाड समर्थकानी घातलेला धिंगाणा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला आहे.
वैद्यकीय तपासणी पोलीस ठाण्यात
आमदार गणपत गायकवाड, हर्षल केणे व संदीप सरवनकर यांची वैद्यकीय तपासणी डॉक्टर पोलीस ठाण्यात आणून केली जाते.