आमदार गायकवाड गोळीबार प्रकरण: काँग्रेसकडून निषेध करून मौन आंदोलन
By सदानंद नाईक | Published: February 6, 2024 04:48 PM2024-02-06T16:48:52+5:302024-02-06T16:48:52+5:30
कुठे नेवून ठेवलाय महाराष्ट्र माझा? असा सवाल रविंद्र धंगेकर यांनी केला
सदानंद नाईक, उल्हासनगर: शहरातील हिललाईन पोलीस ठाण्यात सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने केलेल्या गोळीबाराचा काँग्रेसकडून निषेध व्यक्त करून कुठे नेवून ठेवलाय महाराष्ट्र माझा? असा प्रश्न काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी उपस्थित केला. तसेच सोमवारी नेताजी चौकात पक्षाच्या पदाधिकार्यांनी निषेध व्यक्त करून मौन आंदोलन केले.
उल्हासनगर येथील हिललाईन पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या केबिन मध्ये सत्ताधारी भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण पूर्व शहरप्रमुख महेश गायकवाड व हर्षल केणे यांच्यावर गोळीबार केला. यांप्रकाराने महाराष्ट्र हादरून गेला असून सत्ताधारी भाजपा व शिंदे सरकारातील कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचा आरोप काँग्रेसने केला. शहर काँग्रेस पक्षाने सोमवारी दुपारी ३ ते ५ वाजता नेताजी चौकात निषेद व्यक्त करण्यासाठी मौन आंदोलन केले आहे. यावेळी पक्षाचे आमदार रवींद्र धनगेकर यांनी कुठे नेवून ठेवला महाराष्ट्र माझा. असा प्रश्न करून सत्ताधारी कारभारावर प्रश्नचिन्हे केला. शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे, गटनेते अंजली साळवे, कल्याण जिल्हा अध्यक्ष सचिन पोटे, राष्ट्रवादी पवार गटाचे नेते महेश तपासे, यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थितीत होते.
नेताजी चौकातील निषेध व मौन आंदोलनाला पक्षाचे वज्जरुद्दीन खान, किशोर धडके, नाणिक आहुजा, अंजली साळवे, सिंधुताई रामटेके, मनीषा महाकाले, कुलदीप ऐलसिंघानी, महेश मीरानी, अझीझ खान, शहबुद्धीनं खान, जयप्रकाश अनार्डे, हितेश मटा, कमला मेलकुंदे, नारायण गेमनानी, आशाराम टाक, राजेश मल्होत्रा, अमर जोशी, विशाल सोनावणे, दीपक सोनावणे ,अख्तर खान, आबा साठे, संतोष मिंडे, राकेश मिश्रा, रोहीत ओव्हाळ, डॉ. धीरज पाटोळे, फझल खान, फरियाद शेख, प्रदीप बागुल, शाम माधवी, फामिदा शेख, ईश्वर जग्याशी, दीपक गायकवाड, अन्सर शेख, संतोष वानखेडे, रणजीत साळवे, किशोर ढवारे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.