परिवहन सेवा सुरू न केल्यास बेमुदत उपोषणाचा आमदार गीता जैन यांचा पालिकेला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2020 09:58 PM2020-10-05T21:58:35+5:302020-10-05T21:59:08+5:30
सदर ठेकेदारास काळ्या यादीत टाकून पालिकेने बस सेवा सुरु करून नागरिकांचे हाल थांबवले नाही तर १२ ऑक्टॉबर पासून बेमुदत उपोषण करेन असा इशारा आमदार गीता जैन ह्यांनी दिला आहे .
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेने परिवहन सेवेच्या ठेकेदारास सातत्याने पाठीशी घालण्याचे काम करून शहरातील नागरिकांना गेल्या चार महिन्यां पासून बस सेवे पासून वंचित ठेवले आहे. सदर ठेकेदारास काळ्या यादीत टाकून पालिकेने बस सेवा सुरु करून नागरिकांचे हाल थांबवले नाही तर १२ ऑक्टॉबर पासून बेमुदत उपोषण करेन असा इशारा आमदार गीता जैन ह्यांनी दिला आहे .
राज्य शासनाने मिशन अगेन नुसार परिवहन सेवा ३ जून पासून सुरु करण्यास परवानगी दिलेली आहे . तसे असताना महापालिका प्रशासनाने ठेकेदार भागीरथी एमबीएमटी ह्याचे चोचले पुरवत त्याला सतत पाठीशी घालण्याचे काम चालवले आहे . ठेकेदाराला प्रचंड आर्थिक फायदा करून देण्यासाठी सर्व खटाटोप सुरु असून शहरातील नागरिकांना बस सेवा मिळाली नाही तरी ह्या प्रशासनाला काही सोयर सुतक नसल्याचा आरोप आ. गीता ह्यांनी केला आहे.
भाईंदर पश्चिम भागातील मुर्धा , राई , मोरवा , डोंगरी , उत्तन , चौक व पाली परिसरातून नोकरी व कामधंद्या साठी हजारो नागरिकांना भाईंदर वा अन्य कामाच्या ठिकाणी प्रवास करावा लागतो . त्यांच्यासाठी पालिकेची बस हीच एकमेव प्रवासाचे पर्यायी साधन आहे . परंतु बस सेवा ठेकेदाराने बंद ठेवल्याने तेथील नागरिकांचे सर्वात जास्त हाल होत आहेत . तशीच परिस्थिती शहरातील अन्य भागातील नागरिकांची झालेली आहे .
ठेकेदाराचा ठेका रद्द करून त्याला काळ्या यादीत टाका . कारण वसई विरार मध्ये हा ठेकेदार आता मोठा थकबाकीदार ठरला आहे . स्वतः ठेकेदाराने आपण बुडीत निघाल्याचे व्हिडीओ प्रसिद्ध करून सांगितले आहे . पालिकेने सतत सांगून देखील ठेकेदाराने बस सेवा सुरु केलेली नाही . परंतु लेखी तक्रारी आयुक्तांना करून व प्रत्यक्ष प्रशासनाशी चर्चा करून देखील नागरिकांच्या हिता ऐवजी ठेकेदाराचे हित साधण्याचे प्रकार संगनमताने सुरु आहेत . असा आरोप आ. गीता जैन