अनाधिकृत बांधकामांच्या मागील ब्रम्हा, विष्णु, महेश कोण?आमदार आव्हाडांनी केलं असं ट्विट
By अजित मांडके | Published: December 7, 2022 03:49 PM2022-12-07T15:49:27+5:302022-12-07T15:53:43+5:30
कळव्यासह, मुंब्रा, दिवा, कोपरी, उथळसर, घोडबंदर, आदींसह शहराच्या इतर महत्वाच्या भागांमध्येही अनाधिकृत बांधकामे फोफावती चालली असल्याचे चित्र आहे.
ठाणे : मुंब्य्रातील नऊ बेकायदा धोकादायक इमारतींवरील न्यायालयीन कारवाई प्रलंबित असताना कळव्यासह, मुंब्रा, दिवा, कोपरी, उथळसर, घोडबंदर, आदींसह शहराच्या इतर महत्वाच्या भागांमध्येही अनाधिकृत बांधकामे फोफावती चालली असल्याचे चित्र आहे. त्यातही कळव्यातील २० अनाधिकृत बांधकामांची यादी पालिकेला दिल्यानंतरही त्यावर कारवाई अद्यापही झालेली नाही. असे असतांना कळव्यात वाढत असलेल्या अनाधिकृत इमारतींच्या मुद्यावर आमदार जितेंद्र आव्हाड चांगलेच खवळले आहेत. अनाधिकृत बांधकाम ज्या पध्दतीने कळव्यात चालू आहे ते बघितल्यावर प्रशासन आहे कुठे? असा प्रश्न पडतो, आयुक्त, उपायुक्त यांच्याशी बोललो पण चालूच ब्रम्हा, विष्णु, महेश यांचे कारस्थान असे काहीसे टीव्ट करीत महापालिका आयुक्तांना थेट इशारा दिला आहे.
कोरोना काळात ज्या पद्धतीने ठाणो पालिका क्षेत्नात अनाधिकृत बांधकामांचे पेव फुटले होते. त्याच पद्धतीने बेकायदा बांधकामांचा सुळसुळाट सुरु झाला आहे. शहरात अशी किती बेकायदा बांधकामे सुरू आहेत याची माहिती मात्र पालिकेच्या दप्तरी नाही. किंबहुना त्याचा सव्र्हे देखील केला गेला नसल्याचे पालिका अधिकारी सांगतात, आलेल्या तक्रारींवर कारवाई केली जात आहे. त्यानुसार महापालिकेने मागील काही महिन्यात अनाधिकृत बांधकामांवर कारवाई करतांना एमआरटीपीची ३१ प्रकरणो दाखल केली आहे. मात्र ज्या भागात एमआरटीपी अंतर्गत कारवाई केली जात आहे, त्याच भागात नव्याने बांधकामे उभी राहत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यात मुंब्य्रातील त्या ९ इमारतींचा मुद्दा चर्चेत असतांना कळव्यातील सुमारे २० अनाधिकृत बांधकामांची यादीच बाहेर आल्याने पालिकेच्या कारवाई बाबतही प्रश्न चिन्हे उभे राहिले आहे.
दरम्यान अनाधिकृत बांधकामांच्या मुद्यावरुन आजी, माजी १४ सहाय्यक आयुक्तांची चौकशी लागली आहे. मात्र त्या चौकशीचे काय झाले याचे उत्तर आजही मिळू शकलेले नाही. त्यातही या बांधकामांच्या विरोधात आवाज उठविल्यानंतर थातुरमातुर कारवाई प्रशासनाकडून केली जाते. मात्र पुन्हा या इमारती उभ्या राहतांना दिसत आहेत. या बांधकामांना प्रशासकीय पाठींबा मिळत असल्यानेच ही बांधकामे उभी राहत असल्याचे दिसत आहेत. त्यात कळव्यातर अनेकांनी जागेचा शोध घेऊन त्याठिकाणी थेट इमारतींचे बांधकाम सुरु केली आहेत, मग ती जागा खाजगी असो किंवा शासनाची असो याचा कोणताही विचार न करता तब्बल ९ माळ्यार्पयतच्या इमारती उभ्या राहत आहेत.
आता याच अनाधिकृत बांधकामांच्या मुद्यावरुन आमदार आव्हाड यांनी पालिका आयुक्तांना थेट इशारा दिला आहे. अनाधिकृत बांधकामांच्या विरोधात तक्रारी करुनही कारवाई होत नसल्याने या बांधकामांना पाठीशी घालणारे ते ब्रम्हा, विष्णु, महेश कोण असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी केलेल्या या टीव्ट मधून त्यांना सहाय्यक आयुक्त, अतिक्रमण सहाय्यक आयुक्त आणि उपायुक्तांना या माध्यमातून अप्रत्यक्षपणो निशाना साधल्याचेच दिसत आहे.