आ. किसन कथोरेंकडून विधवा महिलांच्या मुलींचं कन्यादान 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2018 08:38 PM2018-04-29T20:38:04+5:302018-04-29T20:38:04+5:30

कथोरेंच्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद

mla kisan kathores social initiative getting good response | आ. किसन कथोरेंकडून विधवा महिलांच्या मुलींचं कन्यादान 

आ. किसन कथोरेंकडून विधवा महिलांच्या मुलींचं कन्यादान 

Next

टिटवाळा : आमदार किसन कथोरेंनी मुरबाड, अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यातील विधवा महिलांच्या 71 मुलींचं कन्यादान केलंय. किसन कथोरे आणि त्यांच्या पत्नी कमल कथोरेंनी गेल्या वर्षीपासून विधवा महिलांच्या मुलींचं कन्यादन करण्यास सुरुवात केली. गेल्या वर्षी त्यांनी 127 मुलींचं कन्यादान केलं होतं. वडिलांचं छत्र हरवलेल्या हरवलेल्या मुलींना मदत व्हावी, यासाठी कथोरेंकडून हा उपक्रम राबवला जातो. 

कथोरे यांनी सुरु केलेल्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. यावेळी या उपक्रमांतर्गत मौजे बलेणी कल्याण येथील आई वडिल नसलेल्या एका दिव्यांग मुलीचंही कन्यादान करण्यात आलं. उपक्रमाला वाढता प्रतिसाद दरवर्षी मला शंभरपेक्षा जास्त जावई मिळत असल्याचं कथोरे यांनी सांगितलं. याशिवाय वडिलांचा आधार नसलेल्या मुलीला यामुळे सर्वोतोपरी मदत मिळत असल्याचंही ते म्हणाले. या योजनेमुळे मोठा आधार मिळत असल्याची भावना अनेक नवविवाहित वधूंनी व्यक्त केली. 

Web Title: mla kisan kathores social initiative getting good response

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे