उल्हासनगरमधील अवैध धंद्यांविरोधात आमदार कुमार आयलानींचे मुख्यमंत्र्याकडे साकडे 

By सदानंद नाईक | Updated: March 7, 2025 18:40 IST2025-03-07T18:40:38+5:302025-03-07T18:40:55+5:30

MLA Kumar Ailani News: उल्हासनगर शहारातील तीन मटका जुगार अड्ड्यावर गुरुवारी पोलिसांनी धाड टाकून ७ जणावर गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम जप्त केली असून आमदार कुमार आयलानी यांनी अवैध धंद्याबाबत थेट मुख्यमंत्री यांच्याकडे साकडे घातले आहे.

MLA Kumar Ailani appeals to the Chief Minister against illegal businesses in Ulhasnagar | उल्हासनगरमधील अवैध धंद्यांविरोधात आमदार कुमार आयलानींचे मुख्यमंत्र्याकडे साकडे 

उल्हासनगरमधील अवैध धंद्यांविरोधात आमदार कुमार आयलानींचे मुख्यमंत्र्याकडे साकडे 

- सदानंद नाईक
उल्हासनगर : शहारातील तीन मटका जुगार अड्ड्यावर गुरुवारी पोलिसांनी धाड टाकून ७ जणावर गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम जप्त केली असून आमदार कुमार आयलानी यांनी अवैध धंद्याबाबत थेट मुख्यमंत्री यांच्याकडे साकडे घातले आहे. उल्हासनगरात मटका जुगार, तीन पाणी जुगार, ऑनलाईन लॉटरी जुगार, गावठी दारू अड्डे याची भरमार झाल्याचे चित्र आहे. पोलीस दररोज मटका जुगार अड्ड्यावर धाडी टाकूनही त्यांची संख्या कमी होण्या ऐवजी वाढत आहे.

हिललाईन पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी साडे पाच वाजता मठमंदिर तर रात्री संगम लॉज, ३८ सेकशन येथील मटका जुगार अड्ड्यावर धाड टाकून राहुल कैलास वायल, विजय हिरानंद लुल्ला, राजू छत्रदास केसवानी व श्याम मेठाराम जग्याशी, ज्ञानेश्वर विश्वनाथ सावळे यांना अटक करून त्यांच्याकडून मटक्याचे साहित्य व रोख रक्कम जप्त केली. तर दुसऱ्या घटनेत उल्हासनगर पोलिसांनी सोनार गल्ली, कराची मटण शॉप दुकानाच्या गल्लीतील मटका जुगार अड्ड्यावर गुरुवारी रात्री साडे नऊ वाजता धाड टाकून जुगार खेळणारे विक्की पहेलाजराय पन्नवानी व शक्ती मुलचंद भावनानी यांना अटक केली.

 शहरांत तीन कल्याण मटका जुगार अड्ड्यावर विठ्ठलवाडी व हिललाईन पोलिसांनी धाड टाकून एकूण ७ जणांना अटक केली. दरम्यान आमदार कुमार आयलानी यांनी शहरात फोपावलेल्या मटका जुगार अड्डयासह अनैतिक धंध्यावर अंकुश आणण्यासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घालून कारवाईची मागणी केली. तेंव्हा पासून मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई सुरु केली. असे चित्र शहरांत आहेत. 

Web Title: MLA Kumar Ailani appeals to the Chief Minister against illegal businesses in Ulhasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.