आमदार मंदा म्हात्रे व प्रवीण दरेकर लिफ्टमध्ये अडकले, १० ते १५ मिनिटानंतर सुखरूप बाहेर काढले
By नितीन पंडित | Published: July 13, 2023 07:55 PM2023-07-13T19:55:06+5:302023-07-13T19:55:26+5:30
या घटनेमुळे कार्यक्रमास्थळी काही काळ गोंधळ निर्माण झाला होता.
भिवंडी : भाजप प्रदेश कार्यकारिणीचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर गुरुवारी भिवंडीत पार पडले. या शिबिरात उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे केंद्र व राज्यातील मंत्री आमदार खासदार व नेते मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. या शिबिरात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास हजेरी लावली. त्यानंतर फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी फडणवीस यांच्या सभेसाठी नवी मुंबईच्या आमदार मंदा म्हात्रे व आमदार प्रवीण दरेकर हे हॉटेलच्या लिफ्टमधून पहिल्या मजल्यावर चालले होते, मात्र अचानक लिफ्ट मध्ये बिघाड झाल्याने आमदार मंदा म्हात्रे व प्रवीण दरेकर हे दोघेही त्यांच्या सहकाऱ्यांसह सुमारे पंधरा मिनिटे लिफ्टमध्येच अडकले होते. ही लिफ्ट कोपऱ्यात असल्याने सुरुवातीला लिफ्ट अडकल्याचे कोणाच्याही लक्षात आले नाही, त्यातच या ठिकाणी मोबाईल नेटवर्क नसल्याने म्हात्रे व दरेकर यांना मोठा संताप झाला.
अखेर १० ते १५ मिनिटानंतर लिफ्ट सुरू करून म्हात्रे व दरेकर यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. लिफ्टमधून सुखरूप बाहेर आल्याने मंदा म्हात्रे व दरेकरांनी सुटकेचा निःश्वास सोडला. या घटनेमुळे कार्यक्रमास्थळी काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. त्यांनतर म्हात्रे या कार्यक्रमा ठिकानी पहिल्या मजल्यावर जिना चढूनच गेल्या.