मेहतांच्या आंदोलनानंतर आमदार सरनाईकांचा पलटवार; मनपा आयुक्तांना ११ प्रकरणांवर तक्रार देऊन मागितली माहिती
By धीरज परब | Published: November 4, 2023 08:33 PM2023-11-04T20:33:49+5:302023-11-04T20:34:04+5:30
आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नांनी होणाऱ्या राज्यातील पहिल्या संगीत गुरुकुलच्या मैदान आरक्षणातील बांधकामास विरोध करून आंदोलन करणारे भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या वर आ . सरनाईक यांनी तक्रार अर्ज द्वारे पलटवार केला आहे.
मीरारोड - आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नांनी होणाऱ्या राज्यातील पहिल्या संगीत गुरुकुलच्या मैदान आरक्षणातील बांधकामास विरोध करून आंदोलन करणारे भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या वर आ . सरनाईक यांनी तक्रार अर्ज द्वारे पलटवार केला आहे . पालिका आयुक्तांना ११ प्रकरणांची तक्रार करत त्याची माहिती मागितली असून येत्या अधिवेशनात सदर मुद्दे उपस्थित करायचे असल्याचे पत्रात म्हटले आहे . तर दुसऱ्या टप्प्यात आणखी ७ प्रकरणं देणार असल्याचे आ . सरनाईक यांनी सांगितले आहे.
मेहतांशी संबंधित सेव्हन स्क्वेअर शाळेच्या मागील महापालिका मैदान आरक्षणात या . सरनाईक यांच्या प्रयत्नांनी काही जागेत लता मंगेशकर संगीतात अकादमी मंजूर झाली आहे . मात्र मेहतांनी त्यास विरोध करत शुक्रवारी महापालिके बाहेर आंदोलन केले . सदर मैदान पूर्णपणे उपलब्ध न होता खेळाडू मैदान पासून वंचित राहणार आहेत . त्यामुळे नागरिक व खेळाडूं मध्ये तीव्र असंतोष पसरला असून संगीत अकादमी अन्यत्र बांधावी अशी मागणी मेहतांनी पत्राद्वारे केली.
मेहतांच्या भूमिकेवर आ . सरनाईक यांनी पलटवार करत मेहता व त्यांच्याशी संबंधितांच्या ११ प्रकरणां ची आयुक्त संजय काटकर यांच्या कडे लेखी तक्रार केली आहे . काही निधीची कामे मंजूर होऊनही भुमाफियांनी आरक्षित किंवा सुविधा भुखंड ताब्यात दिला नाही, आपला कब्जा सोडला नाही, पालिकेचे काही काम गुंडगिरी करून बंद पाडल्याची माहिती आहे. काही राजकिय नेत्यांनी आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी पक्षाला व जनतेला वेठीस धरून मोर्चा काढून व आंदोलनाचे नाव करून जनतेची दिशाभूल करण्यासाठी हा प्रयत्न केल्याचे आ . सरनाईक यांनी मेहतांचे नाव टाळत तक्रारीत म्हटले आहे.
पालिकेचे काही अधिकारी व कर्मचारीही या दृष्कृत्यामध्ये सहभागी असल्याने कामे सुरू होत नाहीत . मुख्यमंत्र्यांनी दिलेला निधी वाया जावू नये व प्रशासनाकडून योग्य सहकार्य मिळत नसल्याने हिवाळी अधिवेशनामध्ये मुद्दे मांडावयाचे असल्याने कागदपत्रांसहीत माहिती मागितली आहे.
प्लेझंट पार्क रस्त्याचा ७०० चौ.मी.चा टी.डी.आर. एका विकासकाने घेऊन सुद्धा रस्त्याची जागा पालिकेकडे हस्तांतरित केली नाही. ? सुर्या धरण पाणी पुरवठा योजनेतील चेणे गाव येथील मुख्य जलवाहिनीचे काम विकासकाने थांबविले आहे . मीट्रो मार्गातील काशीगाव मेट्रो स्टेशनची ४५ मीटर रस्त्यामधील जागा स्वत:च्या मालकीची नसताना काही बेकायदेशीर काम नगररचना विभागाकडून मंजूर करण्याकरिता गुंडगिरी करून काम थांबविले.
आरक्षण क्र. २४६ जागेतील ६००० चौ.मी.ची आरक्षित जागा पालिकेकडे सुपूर्द न करता बेकायदेशीररित्या खाजगी टर्फ उभारून त्याचा वाणिज्या वापर चालला आहे . आरक्षण क्र. २४३ तरण तलावासाठी आरक्षित असताना ती जागा महानगरपालिकेकडे हस्तांतरीत न करता त्या जागेचा वाणिज्य वापर चालवला आहे . रामदेव पार्क येथील आरक्षण क्र. २३३ मध्ये बेकायदेशीररित्या फुड हब तयार करून व्यावसायिकांना भाड्याने दिले आहे.
अपना घर संकुलातील २७५ चौ.मी. चा सुविधा भुखंड रस्ता व कुंपणभिंत घालून न देता स्वतःची भासवून फसवणूक केली आहे . ३२८ व २५२ या जागा खासगी संस्था चालकांना सत्तेचा दुरूपयोग करून बेकायदेशीररित्या नाममात्र दराने दिल्या गेल्या.
विमल डेअरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोकळया भुखंडावर बेकायदेशीररित्या फेरीवाले व हातगाडीवाल्यांना बसविले आहे. गोल्डन नेस्टची महानगरपालिकेच्या आरक्षण क्र.२१४ असलेल्या भुखंडावर उद्यान पालिकेकडे हस्तांतरीत न करता कोर्टयार्ड या वाणिज्य इमारतीचे बेकायदेशीररित्या बांधकाम चालू आहे . विविध पोलीस ठाण्यात कांदळवनाची कत्तल व पर्यावरणाचा -हास केल्याचे गुन्हे दाखल आहेत अश्या ११ मुद्द्यांवर आ . सरनाईकानी पत्र देऊन मेहतांना काटशह दिल्याचे मानले जाते. तर ७/११ प्रश्न मालीकापैकी उर्वरित ७ प्रश्न दुसऱ्या टप्प्यात मागविण्यात येतील. चुकीची माहिती दिल्यास अधिकाऱ्यांवर हक्कभंग आणण्याचा इशारा आ . सरनाईकानी दिला आहे .