कल्याण-शीळ रोडवरील वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी आमदार राजू पाटील यांचा अधिकाऱ्यांसह पाहणी दौरा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 07:00 PM2020-06-17T19:00:25+5:302020-06-17T19:01:20+5:30
मनसे आमदार राजू पाटील यांनी बुधवारी एम.एस.आर.डी.सी ,रेल्वे आणि वाहतूक पोलिसांसोबत पुलाचा दौरा करत, हलक्या वाहनांसाठी पूल वाहतूकीसाठी खुला करता येईल का याची पाहणी केली
डोंबिवली - कल्याण-शीळ रोडवरील निळजे पूल वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई आयआयटीने रेल्वेला दिलेल्या अहवालात हा पूल धोकादायक ठरला होता. मात्र या पुलावरून होणारी वाहतूक बंद झाल्याने वाहतूक कोंडी मध्ये अधिक भर पडली आहे.त्यामुळे या पुलाची तात्पुरती दुरुस्ती करून हलक्या वाहनांसाठी प्रवेश देण्याची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली होती. बुधवारी एम.एस.आर.डी.सी ,रेल्वे आणि वाहतूक पोलिसांसोबत पुलाचा दौरा करत, हलक्या वाहनांसाठी पूल वाहतूकीसाठी खुला करता येईल का याची पाहणी केली आणि जड-अवजड वाहनांची वाहतूक कल्याण शीळ-रोडवर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. तळोजा मार्गे त्यांना जाण्याचे निर्देश दिले जाईल.
अंबरनाथ,बदलापूर,कल्याण,डोंबिवली मधून ठाणे आणि मुंबईच्या दिशेने वाहनचालक मोठ्या संख्येने जात असतात. डोंबिवली शिळ महामार्गावरील असलेल्या निळजे पुलावरून जाणारी मुंबई ठाण्याच्या दिशेची वाहतूक बंद करण्यात आली आहे. पुलावरील वाहतूक बंद केल्याने उल्हासनगर, अंबरनाथ,कल्याण डोंबिवली रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिका देखील वाहतीक कोंडी मध्ये अडकून पडत होत्या.अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा मोठा मनस्ताप वाहनचालकांना करावा लागत आहे.त्यासाठी या पुलावरून हलक्या वाहनांना प्रवेश देऊन वाहनचालकांची तात्पुरती डोकेदुखी दूर करण्याची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली होती. बुधवारी आमदार राजू पाटील यांनी वाहतूक ,रेल्वे आणि एम.एस.आर.डी.सी.च्या अधिकाऱ्यांना घेऊन पाहणी केली आहे.त्यामुळे या पुलाची तात्पुरती दुरुस्ती करून वाहतुकीसाठी लवकरच खुला होणार आहे.यावेळी एम.एस. आर.डी.सी.चे कार्यकारी अभियंता श्री.बडोळे ,टीम लीडर संतोष गुप्ता वाहतूक शाखेचे उपायुक्त अमित काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप उगले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र शिरसाठ, रेल्वेचे मुंबई डिव्हीजनल अभियंता ए. के.हिवाळे आणि संदीप सिन्ना यांच्या उपस्थितीत पुलाची पाहणी केली आहे.