आमदार रविंद्र फाटक पुन्हा रूग्णालयात, साप चावल्याची प्राथमिक माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 10:30 PM2020-05-16T22:30:45+5:302020-05-16T22:31:50+5:30
मुंबईतील खासगी रुग्णालयात सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. रविवारी ते पुन्हा घरी परततील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला
ठाणे : ठाण्यातील विधानपरिषदेचे आमदार रविंद्र फाटक यांना पुन्हा शनिवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांचा रक्तदाब कमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली असली तरी त्यांना साप चावल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते.
मुंबईतील खासगी रुग्णालयात सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. रविवारी ते पुन्हा घरी परततील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शुक्रवारी सायंकाळी ते रुग्णालयातून घरी परतले होते. रात्री ते आराम करण्यासाठी येऊर येथील बंगल्यावर गेले होते. सकाळी बाथरूममधे त्यांना साप चावला. त्यानंतर त्यांना लागलीच खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती ठीक असल्याचे त्यांचा निकटवर्तियांनी सांगितले, रविवारी ते घरी येतील असा विश्वासही व्यक्त केला आहे.