शहापूरच्या रस्त्यासाठी आमदार बसणार खड्ड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:46 AM2021-09-23T04:46:36+5:302021-09-23T04:46:36+5:30

शेणवा : शहापूर तालुक्यातील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या डबक्याचे स्वरूप आलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम १ ऑक्टोबरला सुरू न ...

MLA to sit in pit for Shahapur road | शहापूरच्या रस्त्यासाठी आमदार बसणार खड्ड्यात

शहापूरच्या रस्त्यासाठी आमदार बसणार खड्ड्यात

googlenewsNext

शेणवा : शहापूर तालुक्यातील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या डबक्याचे स्वरूप आलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम १ ऑक्टोबरला सुरू न झाल्यास २ ऑक्टोबरला या महामार्गावरील खड्ड्यांत बसून आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादीचे आमदार दौलत दरोडा यांनी पत्रकार परिषदेत दिला.

शहापूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ या महामार्गावरील शहापूर-सापगाव हा तीन किमी अंतर असलेला रस्ता चार वर्षांपासून रखडला आहे. रस्त्यावरील खड्ड्यांना डबक्याचे स्वरूप आले आहे. या रस्त्यावरून वाहने चालविणे वाहनचालकांना जिकिरीचे झाले आहे. खड्डे चुकविताना झालेल्या अपघाताच्या घटनांत तरुणांचा बळी गेल्याच्या घटना घडल्या आहेत. अपघाताबाबत संवेदनशील बनलेला जीवघेणा रस्ता त्वरित व्हावा यासाठी विविध राजकीय, सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन तक्रारी व आंदोलनही केले. मात्र, याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत असून, या रस्त्यासाठी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्थानिक सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या बैठकीत सध्या ११ मीटर रुंद असलेल्या या रस्त्याचे काम १ ऑक्टोबरला सुरू करण्याचे ठरले. मात्र, या रस्त्याचे काम १ ऑक्टोबरला सुरू न झाल्यास एमएसआरडीएचे एमआरडीसी असे नामकरण करून २ ऑक्टोबरला या रस्त्यावरील खड्ड्यात बसून आंदोलन करण्याचा इशारा आमदार दौलत दरोडा यांनी दिला.

Web Title: MLA to sit in pit for Shahapur road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.