आमदारांनी घेतली जीवन प्राधिकरणाच्या अधिका-यांची शाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 06:22 PM2018-10-30T18:22:39+5:302018-10-30T18:23:19+5:30

‘पाणी मिळाले, निधीही मिळाला, वितरणाचे काय?’ या मधळ्याखाली लोकमतमध्ये पाणी वितरण व्यवस्थेसंदर्भात जी भूमीका मांडण्यात आली होती त्या अनुशंगाने आमदार किसन कथोरे यांनी अधिका-यांची महत्वाची बैठक आयोजित केली होती.

MLAs took over the jeevan pradhikaran authority's Class | आमदारांनी घेतली जीवन प्राधिकरणाच्या अधिका-यांची शाळा

आमदारांनी घेतली जीवन प्राधिकरणाच्या अधिका-यांची शाळा

Next

 - पंकज पाटील

बदलापूर - ‘ पाणी मिळाले, निधीही मिळाला, वितरणाचे काय?’ या मधळ्याखाली लोकमतमध्ये पाणी वितरण व्यवस्थेसंदर्भात जी भूमीका मांडण्यात आली होती त्या अनुशंगाने आमदार किसन कथोरे यांनी अधिका-यांची महत्वाची बैठक आयोजित केली होती. पटबंधारे विभाग आणि जीवन प्राधिकरणाच्या सर्व अधिका-यांना या बैठकीत बोलाविण्यात आले होते. यावेळी जीवन प्राधिकरणाकडुन होणा-या चुकांची चर्चा करण्यात आली. तसेच या कामचुकार अधिका-यांची शाळा घेत सर्व अधिका-यांना नियोजनबध्द पध्दतीने काम करण्याची ताकिद देण्यात आली. या पुढे तसे न घडल्यास ही योजना हस्तांतरीत करण्याचा विचार केला जाईल असे आमदार कथोरे यांनी अधिका-यांना बजावले. 

    लोकमतमध्ये सोमवारी प्रसिध्द झालेल्या बातमीनंतर आमदार कथारे यांनी जीवन प्राधिकरणाचे अंबरनाथ आणि बदलापूरातील सर्व अधिका-यांसोबत बैठक आयोजित केली होती. जीवन प्राधिकरण पाणी वितरण व्यवस्थेतील त्रुटींना पाटबंधारे विभागालाही जबाबदार धरत असल्याने पाटबंधारे विभागाच्या अधिका-यांना देखील या बैठकीला बोलाविण्यात आले होते. अंबरनाथ आणि बदलापूर शहरासाठी 50 दशलक्ष लिटर्स पाणी उपलब्ध झालेले असले तरी त्याचे विरण करण्यात अनेक अडचणी येत आहेत. वितरण व्यवस्था सुधारण्यासाठीही अमृत योजनेच्या दुस-या टप्यात निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. मात्र असे असले तरी योजनेच्या कामानंतरही जीवन प्राधिकरण पाण्याचे योग्य नियोजन आणि वितरन करित नसल्याच्या तक्रारी समोर आले होते. पाण्याचे नियोजन करतांना आठवडय़ातुन एक दिवस पाणी पुरवठा बंद करण्याचे निर्देश पाटबंधारे विभागाने दिले आहे. त्याची अमलबजावणी करण्यात येत आहे. मात्र ते करित असतांना त्याचा त्रस हा नागरिकांना होत आहे. एक दिवस वितरण व्यवस्था बंद राहिल्यावर त्याचा फटका हा पुढे दोन दिवस सहन करावा लागत आहे. त्यामुळे वितरण व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या हेतुन आमदार कथोरे यांनी ही बैठक घेतली. या बैठकीला जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता मनिषा पालांडे ह्या देखील हजर होत्या. यावेळी कथोरे यांनी अस्तित्वातील सुरुअसलेल्या कामांचा आधावा घेतला. तसेच अमृत योजनेतुन सुरु असलेल्या कामांबाबत कथोरे यांनी नाराजी व्यक्त केली. अमृत योजनेचे काम करतांना मोठय़ा प्रमाणात विलंब होत असल्याच्या तक्रारी येत असल्याचे कथोरे यांनी स्पष्ट केले. अंबरनाथच्या बाबतीत देखील ठेकेदार कामचुकारपणा करित असल्याची बाब कथोरे यांनी अधिका-यांच्या निदर्शनास आणून दिली. कामाला विलंब करणा-या ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले. योजनेचे काम करतांना अस्तित्वातील लोकवस्तीचा विचार न करता भविष्यात निर्माण होणारी लोकवस्तीचा विचार करुन प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सुचना देण्यात आले. 

    अंबरनाथ आणि बदलापूरच्या पाणी वितरण व्यवस्थेबाबत माहिती घेतली असता जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता पालंडे यांनी पाणी गळतीचे प्रमाण ही डोकेदुखी असल्याचे स्पष्ट केले. तब्बल 37 टक्के पाणी गळती असल्याने पाणी तुटवडा त्यामुळे निर्माण होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. नवीन योजना झाल्यावर ही गळती कमी होईल अशी अपेक्षा होती. मात्र जुन्या वाहिन्या सुरुच राहिल्याने जळतीचे प्रमाण कमी होण्या ऐवजी वाढल्याचे समोर आले. यावर तोडगा काढण्याचे आदेश कथोरे यांनी दिले. 10 ते 15 दशलक्ष लिटर्स पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. मात्र जीवन प्राधिकरण 100 दशलक्ष लिटर्स पाणी उचलत असेल आणि त्यातील 4क् दशलक्ष लिटर्स पाणी हे वाया जात असेल तर ही मोठी समस्या आहे. ही सुधारण्याकडे लक्ष केद्रीत करण्याच्या सुचनाही दिल्या. 

    ठाणो जिल्ह्यात पाणी नाही अशी ओरड सर्वच नेते करित असतात. मात्र ते पाणी आणण्यासाठी लहान लहान धरणो बांधण्यासाठी कोणी पुढे सरसावत नाहीत. तालुक्यात आणि जिल्ह्यात लहान लहान धरणो उभारणो ही काळाची गरज आहे. मोठे धरणो उभारतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे लहान  धरणो हाच एकमेव पर्याय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भविष्याचा विचार करतांना पाण्याचे स्त्रोत निर्माण करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. 

Web Title: MLAs took over the jeevan pradhikaran authority's Class

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.