मिरा-भाईंदर पालिका प्रभाग कार्यालयात प्रभाग अधिकाऱ्यास मनसे कार्यकर्त्यांची मारहाण  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 09:04 PM2020-08-16T21:04:49+5:302020-08-16T21:05:21+5:30

प्रभाग समिती कार्यालय ६ मध्ये आज रविवारी दुपारी काही मनसेचे कार्यकर्ते गेले होते . त्यातील एका कार्यकर्त्याने फेसबुक वर लाईव्ह व्हिडीओ चालवला होता .

MNS activists beat up ward officer at Mira Bhayander Municipal Corporation ward office | मिरा-भाईंदर पालिका प्रभाग कार्यालयात प्रभाग अधिकाऱ्यास मनसे कार्यकर्त्यांची मारहाण  

मिरा-भाईंदर पालिका प्रभाग कार्यालयात प्रभाग अधिकाऱ्यास मनसे कार्यकर्त्यांची मारहाण  

Next

मीरारोड - मीरारोडच्या राम नगर येथील प्रभाग कार्यालयात दारूची पार्टी सुरु असल्याचा आरोप करत मनसेचे कार्यकर्ते कार्यालयात शिरले होते . त्या वरून अधिकाऱ्यांना शिवीगाळ - दमदाटी करत एका प्रभाग अधिकाऱ्यास मारहाण केल्याची घटना रविवारी घडली आहे .

प्रभाग समिती कार्यालय ६ मध्ये आज रविवारी दुपारी काही मनसेचे कार्यकर्ते गेले होते . त्यातील एका कार्यकर्त्याने फेसबुक वर लाईव्ह व्हिडीओ चालवला होता . त्या नुसार अधिकारी व कर्मचारी दारूची पार्टी करत होते आणि आम्हाला पाहून ग्लास व बाटली खाली फेकून दिल्याचा आरोप केला . तर प्रभाग अधिकारी सुदाम गोडसे , निवृत्त अधिकारी दादासाहेब खेत्रे यांनी आम्ही अजिबात दारू घेतली नसून तसला काही प्रकार नाही . वाटल्यास आमची वैद्यकीय चाचणी करा असे मनसैनिकांना सांगितले .

शीतल नगर येथील गटारात पडून मरण पावलेल्या तरुणा प्रकरणी प्रभाग अधिकाऱ्यांवर ठपका ठेवला जात असल्याने आयुक्तांना निवेदन देण्यासाठी ते बनवण्याचे काम करत होतो असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले . तर मनसैनिकांनी मात्र तुम्ही बाटली , ग्लास खाली फेकला हे आम्ही पहिले असून ते उचलून आणत अधिकाऱ्यांना दाखवले .

त्यातच प्रभाग अधिकारी प्रकाश कुलकर्णी यांच्या तोंडावरचा मास्क आधी कार्यकर्त्यांनी काढायला लावला . नंतर बोलाचाली झाल्या असता कार्यकर्त्यांनी कुलकर्णी यांना मारहाण व शिवीगाळ केली . पोलिस घटनास्थळी आल्यावर सर्वाना पोलिस ठाण्यात घेऊन गेले . पालिका अधिकाऱ्यांना वैद्यकीय तपासणी साठी मीरारोडच्या इंदिरा गांधी पालिका रुग्णालयात पाठवण्यात आले .

काशिमीरा पोलीस कार्यालयात गेले असता दारू पीत होते वा तसा काही पुरावा कार्यालयात आढळला नसल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले . तर अधिकाऱ्यांची वैद्यकीय तपासणी अहवाल तसेच फिर्यादी नंतर गुन्हा दाखल केला जाईल असे वरिष्ठ निरीक्षक संजय हजारे यांनी सांगितले .

Web Title: MNS activists beat up ward officer at Mira Bhayander Municipal Corporation ward office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.