कल्याणमध्ये मनसे कार्यकर्त्याची महिला फेरीवालीला मारहाण, पैसे द्यायला नकार दिल्याने मारहाण केल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2017 04:16 PM2017-12-02T16:16:23+5:302017-12-02T16:16:33+5:30

कल्याणमध्ये मनसे कार्यकर्त्याने फेरीवाल्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे.

MNS activists beaten women hawker | कल्याणमध्ये मनसे कार्यकर्त्याची महिला फेरीवालीला मारहाण, पैसे द्यायला नकार दिल्याने मारहाण केल्याचा आरोप

कल्याणमध्ये मनसे कार्यकर्त्याची महिला फेरीवालीला मारहाण, पैसे द्यायला नकार दिल्याने मारहाण केल्याचा आरोप

Next

कल्याण- कल्याणमध्ये मनसे कार्यकर्त्याने फेरीवाल्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे. भाजी विक्रेत्या महिला फेरीवालीला मारहाण झाली आहे. या महिलेसह तिलाही मारहाण करण्यात आल्याचा आरोप केला जातो आहे. मनसे कार्यकर्ता वारंवार पैशांची मागणी करायचा त्याला पैसे दिले नाहीत म्हणून मारहाण करून विनयभंग केल्याचा आरोप महिलेने केला आहे. दरम्यान, मारहाण करणाऱ्या मनसे कार्यकर्त्याविरोधात खंडणी व विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. पण मारहाण करणारी व्यक्ती मनसेमध्ये कार्यरत नसल्याचं स्पष्टीकरण मनसेचे कल्याण शहराध्यक्ष कौस्तुभ देसाई यांनी दिलं आहे.  विकास हा मनसेचा कार्यकर्ता दोन वर्षापूर्वी होता. आत्ता तो मनसेत कार्यरत नाही. त्यामुळे या प्रकरणाशी मनसेचा काही एक संबंध नाही असं स्पष्ट केलं आहे. 

कल्याण-शहराच्या पूर्व भागातील गणपती मंदीर परिसरात भाजी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या  महिलेस व तिच्या मुलीला मारहाण करुन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी मनसे कार्यकर्ता विलास जाधवसह अन्य चार जणांच्या विरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनसे कार्यकर्ता विकास हा भाजी विकणाऱ्या महिलेस भाजी या जागेवर बसून भाजी विकू नकोस. जागा आमची आहे. भाजी विकायची असल्यास त्या बदल्यात पैसे द्यावे लागतील. विकासकडून महिलेकडे वारंवार पैशाची मागणी केली जात होती. तिने पैसे देण्यास नकार दिल्याने तिला विकासने मारहाण केली. केवळ भाजी विकणाऱ्या महिलेस त्याने मारहाण केली नाही. तर तिच्या तरुण मुलीलाही मारहाण केली. तिच्या मुलीचा विनयभंग केला असा आरोप महिलेसह तिच्या मुलीने केला आहे. 

महिलेच्या तक्रारीनुसार कोळसेवाडी पोलिसांनी विकासच्या विरोधात खंडणी मागणं व विनयभंग या दोन आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. 

Web Title: MNS activists beaten women hawker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.