उल्हासनगर महावितरण कार्यालयावर मनसेचा मोर्चा; भारनियमन, डिपॉझिटबिल रद्द करण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 07:54 PM2022-04-29T19:54:13+5:302022-04-29T19:55:13+5:30
उल्हासनगरात विजेचा लपंडाव सुरू झाल्याने, नागरिक उकाड्याने हैराण झाले. हे कमी म्हणून कीं काय नियमित बिला सोबत डिपॉझिट बीले नागरिकांना आल्याने, त्यांच्यात एकच असंतोष निर्माण झाला.
सदानंद नाईक -
उल्हासनगर : शहरात चाललेला विजेचा लपंडाव व आलेल्या डिपॉझिट बिलाच्या निषेधार्थ मनसेने साईबाबा येथील वीज मंडळ कार्यालयावर मनसेने शुक्रवारी दुपारी मोर्चा काढला. कार्यकारी अभियंता नितीन काळे यांना निवेदन देऊन डिपॉझिट बिल रद्द करण्याची मागणी शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी केली.
उल्हासनगरात विजेचा लपंडाव सुरू झाल्याने, नागरिक उकाड्याने हैराण झाले. हे कमी म्हणून कीं काय नियमित बिला सोबत डिपॉझिट बीले नागरिकांना आल्याने, त्यांच्यात एकच असंतोष निर्माण झाला. वीज भारनियमन व डिपॉसिट बिल रद्द करण्यासाठी मनसेने कॅम्प नं-३ साईबाबा मंदिर येथील महावितरण कार्यालयावर शुक्रवारी दुपारी १२ वाजता मोर्चा काढला होता. मोर्चा गेटवर आल्यावर मनसे कार्यकर्ते व पदाधिकार्यांनी वाढीव बिलाची होळी केली. विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन काळे याना मनसे शिष्टमंडळाने निवेदन देऊन भारनियमन व डिपॉझिट बिले रद्द करण्याची मागणी करण्यात आली. वीज भारनियमन बंद झाल्याची माहिती कार्यकारी अभियंता काळे यांनी देऊन डिपॉसिट बिला बाबत माहिती घेणार असल्याचे सांगितले.
पावसाळ्यापूर्वी वीज वाहिनीच्या आड येणाऱ्या झाडाच्या फांद्या तोडण्यात येत असल्याने, वीज जात असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. मनसेच्या मोर्चाचे नेतृत्व शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी केले. असून मनसेचे सचिन कदम, संजय घुगे, प्रदीप गोडसे, मैनूद्दीन शेख, सचिन बॅंडके यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला पदाधिकारी आदीजन सहभागी झाले. विधुत मंडळ कार्यालय परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. डिपॉझिट बिले रद्द झाले नाही तर मनसे पुन्हा आंदोलन करेल. असा इशारा शहाराध्यक्ष बंडू देशमुख यांनी दिला.