मनसेचा वर्धापन दिन यंदा ठाण्यात, राज ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2023 09:57 PM2023-03-08T21:57:59+5:302023-03-08T21:58:57+5:30

गुरुवारी यानिमित्ताने राज ठाकरेंच्या सभेचे आयोजन केले आहे. सभेच्या पार्श्वभूमीवर ‘साहेब’ असे फलक लावून मनसेने वातावरणनिर्मिती केली आहे.

MNS anniversary this year in Thane, attention to Raj Thackeray's role! | मनसेचा वर्धापन दिन यंदा ठाण्यात, राज ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष!

मनसेचा वर्धापन दिन यंदा ठाण्यात, राज ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष!

googlenewsNext

ठाणे : महापालिका निवडणुकांच्या घोषणेची प्रतीक्षा असताना दरवर्षी मुंबईत साजरा केला जाणारा मनसेचा वर्धापन दिन यंदा ठाण्यात पहिल्यांदाच साजरा केला जाणार आहे. गुरुवारी यानिमित्ताने राज ठाकरेंच्या सभेचे आयोजन केले आहे. सभेच्या पार्श्वभूमीवर ‘साहेब’ असे फलक लावून मनसेने वातावरणनिर्मिती केली आहे. सभेच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी मनसेने सुरू केली आहे. 

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर अलीकडेच हल्ला झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज मनसैनिकांना कोणता आदेश देतात, याकडे लक्ष लागले आहे. दुसरीकडे, शिवसेनेतील बंडखोरी आणि राज्यातील सत्ताबदलाचे केंद्र असलेल्या ठाणे शहरात शिवसेना (शिंदे गट) आणि शिवसेना (ठाकरे गट) यामध्ये विविध कारणांमुळे धुसफुस सुरू आहे. या दोन्ही गटांसह भाजप आणि राष्ट्रवादीकडूनही विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन केले जात आहे. 

गेल्या तीन महिन्यांत राज यांनी शहरात विविध कार्यक्रमांनिमित्ताने दोन दौरे केले. त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या होत्या. दरवर्षी मुंबईत साजरा केला जाणारा मनसेचा वर्धापन दिन ठाण्यात पहिल्यांदाच साजरा करण्याचा निर्णय घेतला असून उद्या, गुरुवार ९ मार्च रोजी ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये सायंकाळी हा कार्यक्रम होणार आहे. राज ठाकरे मनसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत.

Web Title: MNS anniversary this year in Thane, attention to Raj Thackeray's role!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.