आव्हाडांनी शो बंद पाडताच मनसेची एंट्री, चित्रपट पुन्हा सुरू करण्याचा आग्रह

By अजित मांडके | Published: November 7, 2022 11:05 PM2022-11-07T23:05:31+5:302022-11-07T23:13:32+5:30

मनसेचे ठाणे-पालघर जिल्हा प्रमुख अविनाश जाधव यांनी विवीयना मॉल मध्ये जाऊन हा शो पुन्हा सूरू करण्याची मागणी केली आहे

MNS Avinash Jadhav's entry as Jitendra Awhad shut down the show, insisting on restarting the film | आव्हाडांनी शो बंद पाडताच मनसेची एंट्री, चित्रपट पुन्हा सुरू करण्याचा आग्रह

आव्हाडांनी शो बंद पाडताच मनसेची एंट्री, चित्रपट पुन्हा सुरू करण्याचा आग्रह

googlenewsNext

ठाणे - हर हर महादेव या मराठी चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे काही चुकीच्या पद्धतीने दाखवलेले आहे, त्याला विरोध करत आज रात्री दहाच्या सुमारास राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विवियाना मॉल येथील शो बंद पडला. यावेळी चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या एका दर्शकाने चित्रपटाचे पैसे परत मागितले तसेच कोण जितेंद्र आवड असा सवाल उपस्थित केल्यानंतर संत तू झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्या दर्शकाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. त्यावरुन, आता मनसे विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना ठाण्यात रंगला आहे. मनसेनं रात्री उशिरा हा चित्रपट सुरू करण्याची मागणी केली आहे.

मनसेचे ठाणे-पालघर जिल्हा प्रमुख अविनाश जाधव यांनी विवीयना मॉल मध्ये जाऊन हा शो पुन्हा सूरू करण्याची मागणी केली आहे. प्रेक्षकांना मारहाण करणे चुकीचे असून मारहाण करण्याऱ्याला अटक करुन कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच शो बघूनच येथून जाणार, कोणाला यायचे त्याने यावे आणि शो बंद करून दाखवावा, असा इशाराच एकप्रकारे त्यांनी जितेंद्र आव्हाड यांना दिला आहे. 
   
काही काही दिवसांपूर्वी हर हर महादेव हा छत्रपती शिवाजी महाराजांवरील आधारित चित्रपट चित्रपटगृहात परदर्शित झालेला आहे मात्र या चित्रपटाला आता विरोध सुरू झालेला आहे. ठाण्यात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रात्री दहा वाजता विवियाना मॉल येथे जाऊन आंदोलन करत छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत चित्रपटाचा शो बंद पडला. यावेळी त्यांनी प्रेक्षकांना विनंती करून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, एका प्रेक्षकांने तिकिटाचे पैसे परत द्या आम्ही आमचा वेळ वाया घालवला आहे का, अशा शब्दात मॉल चालकाला सुनावले. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्याची समजूत देखील काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतप्त झालेल्या या दर्शकाने त्यांचं ऐकलं नाही. अखेर राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण केल्याची घटना घडली. त्यानंतर, या चित्रपटगृहातील नाट्यात मनसेची एंट्री झाली असून मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी शो पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे. 

दरम्यान, इतिहासाची मोडतोड करून हा चित्रपट दाखवल्या जात असल्याचा आरोप यावेळी आव्हाड यांनी केला आहे. बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेली विकृत परंपरा आता चित्रपटांच्या माध्यमातून पुढे येत असल्याचे त्यांनी सांगितलं. मात्र ही विकृती आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा देत हा चित्रपट महाराष्ट्रात कुठेही चालू देणार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. बाजीप्रभू देशपांडे हा छत्रपती शिवाजी महाराजांची लढताना दाखवलेला आहे हा चुकीचा इतिहास दाखवला असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: MNS Avinash Jadhav's entry as Jitendra Awhad shut down the show, insisting on restarting the film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.