DahiHandi MNS: निर्बंध झुगारले! पोलीस बंदोबस्तात ठाणे, मुंबईत मनसेने दहीहंड्या फोडल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 08:54 AM2021-08-31T08:54:40+5:302021-08-31T09:02:11+5:30
MNS break Dahi handi: रात्री १२ वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाण्यात दही हंडी फोडलील. त्या कार्य़कर्त्यांना अटक झाली, परंतू रात्री २ च्या सुमारास तात्काळ जामिनावर सुटका ही झाली.
कोरोनामुळे (corona) राज्य सरकारने दहीहंडी उत्सव साजरा करण्यास मनाई केलेली आहे. यामुळे भाजपा, मनसेने (MNS) याला विरोध केला असून ठाणे, मुंबईत दहीहंडी उत्सव साजरा करणार असल्याचे मनसेने सांगितले होते. यामुळे पोलिस बंदोबस्तत असूनही सारे निर्बंध झुगारून मनसेने ठाणे, मुंबईत ठिकठिकाणी रात्र, पहाटेच्या सुमारास दहीहंडी उभारून, मानवी मनोरे उभारत दहीहंड्या फोडण्यात आल्या. (MNS DahiHandi in Thane, Bhandup.)
रात्री १२ वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाण्यात दही हंडी फोडलील. त्या कार्य़कर्त्यांना अटक झाली, परंतू रात्री २ च्या सुमारास तात्काळ जामिनावर सुटका ही झाली. हिंदू सणांसाठी आम्ही कितीही केसेस घेऊ असे मनसेने म्हटले आहे. कोरोनाचे नियम पायदळी तुडवत हंडी फोडण्यात आली. यावेळी अभिजीत पानसे व अविनाश जाधव यांची पोलिसांच्या बरोबर थोडी झटापट देखील झाली. भगवती शाळेच्या मैदानामध्ये ही दहीहंडी फोडण्यात आली. यावेळी 250 कार्यकर्ते होते.
आम्ही जे ठरवतो ते करतो, दहीहंडी उत्सव साजरा होणारच, असे मनसेचे नेत अविनाश जाधव यांनी सांगितले होते. तसेच बाहेरील राज्यांतून आम्हाला फोन येतात, महाराष्ट्रात दहिहंडी साजरी झालीच पाहिजे, राज ठाकरेंनी ती करावी, अशी मागणी होते असेही जाधव यांनी सांगितले. तर अभिजित पानसे यांनी आम्ही मराठी सण साजरा करणारच असे म्हटले होते.
ठाण्यात, मुंबईत मनसेने दहीहंडी फोडली. अभिजीत पानसे व अविनाश जाधव यांची पोलिसांच्या बरोबर झटापट. https://t.co/CbvSFUjpi9@mnsadhikrut#MNS#dahihandipic.twitter.com/K5f4dzDdTe
— Lokmat (@MiLOKMAT) August 31, 2021
यामुळे आज ठाण्यात वर्तकनगरसह काही ठिकाणी मनसेने दहीहंडी उभारत त्या फोडल्या आहेत. तसेच मुंबईतील भांडूपमध्ये देखील सकाळच्या सुमारास दहीहंडी फोडण्यात आली. यावेळी ठाण्यात काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही नियमांसह दहीहंडी खेळता आली असती. थर आणि उपस्थितीबाबत मर्यादा, वयाचे बंधन घालता आले असते. सगळ्यांनी ते मान्यही केले असते; पण सणच साजरे करायचे नाहीत, ही राज्य सरकारची भूमिका चुकीची आहे, असा आरोप बाळा नांदगावकर यांनी केला आहे.