अंबरनाथमध्ये मनसेने फोडली प्रतीकात्मक दहीहंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:26 AM2021-09-02T05:26:49+5:302021-09-02T05:26:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अंबरनाथ : एकीकडे दहीहंडी उत्सवावर राज्यात बंदी घालण्यात आलेली असताना अंबरनाथमध्ये मनसेचे जिल्हा संघटक संदीप लकडे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबरनाथ : एकीकडे दहीहंडी उत्सवावर राज्यात बंदी घालण्यात आलेली असताना अंबरनाथमध्ये मनसेचे जिल्हा संघटक संदीप लकडे यांनी प्रतीकात्मक दहीहंडी फोडत दहीहंडी उत्सव साजरा केला. फक्त हिंदूंच्या सणांवर निर्बंध का लादले जातात? असा सवालही यावेळी त्यांनी उपस्थित केला.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी राज्यात यंदाही दहीहंडी उत्सवावर घालण्यात आलेली बंदी कायम ठेवण्यात आली आहे. मात्र याला मनसेने विरोध केला आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी अंबरनाथमध्ये मनसेचे जिल्हा संघटक संदीप लकडे यांनी प्रतीकात्मक दहीहंडी फोडत राज्य सरकारच्या धोरणाचा निषेध नोंदवला. अंबरनाथच्या कैलास नगर भागात संदीप लकडे यांनी दहीहंडी उभारत दोन थर लावून ती फोडली. यावेळी जमावबंदीच्या आदेशाचे पालन करत अवघ्या तीन लोकांमध्ये ही दहीहंडी फोडण्यात आली. राज्य सरकारने लादलेले कोरोनाचे नियम आम्हाला मान्य आहेत. मात्र हिंदूंच्या सणांवरील बंदी आम्हाला मान्य नाही, असे संदीप लकडे यांनी स्पष्ट केले आहे.
----------------------------------------------