उल्हासनगर महापालिका शाळा क्रं-१८ व २४ ची पुंर्नबांधणी करा; मनसेची मागणी
By सदानंद नाईक | Published: February 1, 2023 05:52 PM2023-02-01T17:52:50+5:302023-02-01T17:53:57+5:30
शाळांची वाताहत होऊन गरीब व गरजू मुले शिक्षणापासून वंचित राहत असल्याचा आरोप मनसेचे शहाराध्यक्ष बंडू देशमुख यांनी केला.
सदानंद नाईक, उल्हासनगर: महापालिका शाळा क्रं-१८ व २४ मधील हजारो मुले एका खाजगी संस्थेच्या शाळेत शैक्षणिक धडे गेल्या ४ वर्षांपासून गिरवित आहेत. आतातरी मुलांना हक्काची शाळा देण्यासाठी इमारत पुनर्बांधणी करण्याची मागणी मनसेने आयुक्त व अतिरिक्त आयुक्त यांना निवेदन देऊन केली.
उल्हासनगर महापालिकेचे शिक्षण विभागाकडे दुर्लक्ष झाल्याने, शाळांची वाताहत होऊन गरीब व गरजू मुले शिक्षणापासून वंचित राहत असल्याचा आरोप मनसेचे शहाराध्यक्ष बंडू देशमुख यांनी केला. शाळा क्रं-१८ व २४ च्या इमारत पुनर्बांधणीच्या नावाखाली शाळा इमारत गेल्या ४ वर्षांपूर्वी जमीनदोस्त केली. शाळेतील हजारो मुलांना एका खाजसी संस्थेच्या इमारतीत हलविण्यात आले. याठिकाणी पिण्याचे पाणी, शौचालय, बसण्याची असुविधा अशा वातावरणात मुले शैक्षणिक धडे गिरवीत असून त्यांचे शैक्षणिकया नुकसान होत असल्याचा आरोप होत आहे.
महापालिकेच्या मुळ शाळेपासून ही खाजगी संस्थेची शाळा लांब असल्याने, मुलांना जाण्या-येण्याचा त्रास होत आहे. विदयार्थ्यांना त्त्यांच्या हक्काची शाळा लवकरात लवकर उपलब्ध करून देणे. हे महापालिका प्रशासनाच कर्तव्य आहे. परंतु या शाळांच्या पुर्नबांधणी बाबत प्रशासन कानावर हात व तोंडावर बोट ठेऊन असून ही बाब निषेधार्थ असल्याचे देशमुख यांचे म्हणणे आहे. .या शाळेच्या पुंर्नबांधणीच्या कामाला तात्काळ सुरवात करण्यात यावी. व या गोर-गरीब विदयार्थ्यांना एक सुसज्य शाळा लवकरात लवकर उपलब्ध करून दयावी. अन्यथा मनसे या विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करेल. असा इशाराही देशमुख यांनी दिला. याबाबत आयुक्तासह अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर याना निवेदन दिले. संजय घुगे, बंडू देशमुख, ऍड कल्पेश माने, सागर चौहान यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"