बुलेट ट्रेनच्या विरोधासाठी मनसेचे थेट राष्ट्रपतींनाच साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 06:18 AM2018-05-29T06:18:44+5:302018-05-29T06:18:44+5:30

बुलेट ट्रेनचा विरोध दिवसेंदिवस वाढत असताना आता महाराष्ट्रात हा प्रकल्प नको, असे पत्रच मनसेच्या कार्यकर्त्यांनी थेट राष्ट्रपतींना पाठवले आहे.

The MNS directly rescues the President for opposing the bullet train | बुलेट ट्रेनच्या विरोधासाठी मनसेचे थेट राष्ट्रपतींनाच साकडे

बुलेट ट्रेनच्या विरोधासाठी मनसेचे थेट राष्ट्रपतींनाच साकडे

Next

ठाणे : बुलेट ट्रेनचा विरोध दिवसेंदिवस वाढत असताना आता महाराष्ट्रात हा प्रकल्प नको, असे पत्रच मनसेच्या कार्यकर्त्यांनी थेट राष्ट्रपतींना पाठवले आहे. ठाण्यातील दमाणी इस्टेट येथील पोस्ट आॅफिसातून ते पोस्ट केले. ठाण्यातून राष्ट्रपतींना ५० हजारांपेक्षा जास्त पत्रे पाठवून महाराष्ट्रात हा प्रकल्प नको, अशी विनंती त्यांना करण्यात येणार असून यासाठी रेल्वेस्थानक आणि बसस्थाकावर ठिकठिकाणी स्टॉल लावण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली.
मुंबई ते अहमदाबाददरम्यान धावणाऱ्या बुलेट ट्रेनला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आधीपासूनच विरोध दर्शवला आहे. ठाणे जिल्ह्यातदेखील या प्रकल्पासाठी जमीन संपादित करण्यात येत असून जिल्ह्यात सुरू असलेल्या सर्व्हेलादेखील यापूर्वी मनसेने विरोध केला आहे. मात्र, तो डावलून शासनाच्या वतीने मोजणीचे काम सुरूच असल्याने अखेर राष्ट्रपतींनाच याबाबत मनसेने साकडे घातले आहे. राष्ट्रपतींना दिलेल्या पत्रामध्ये त्यांनी बुलेट ट्रेन आणण्यापेक्षा आहे, रेल्वेचा विकास करण्याची विनंती केली आहे. देशातील १२५ करोड जनता अंतर्गत रेल्वेवर अवलंबून आहे. मात्र, मूठभर श्रीमंतांसाठी बुलेट ट्रेनचा प्रकल्प राबवला जात आहे. दरवर्षी अपघातामध्ये हजारो नागरिक मरण पावतात, तर काहींना कायमचे अपंगत्व येते. मुंबईमध्ये तर रेल्वेचा प्रवास अतिशय जीवघेणा झाला आहे. आपल्या पत्रामध्ये त्यांनी उत्तर प्रदेशचेदेखील उदाहरण दिले आहे. उत्तर प्रदेशात एका ठिकाणी रेल्वे फाटक नसल्यामुळे काही शाळकरी मुलांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यामुळे रेल्वेमध्ये अंतर्गत सुधारणा करण्याऐवजी काही श्रीमंत लोकांसाठी बुलेट ट्रेनवर करोडो रु पये खर्च करणे कितपत योग्य आहे, असा सवाल या पत्रामध्ये मनसेने केला आहे.
देशाच्या अनेक भागांमध्ये अजूनही रेल्वेसेवा पोहोचलेली नाही. त्यामुळे आधीही अंतर्गत रेल्वेसेवा सुधारावी आणि बुलेट ट्रेनचा प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी आम्ही पत्रामध्ये केली असल्याची माहिती जाधव यांनी दिली. राष्टÑपती हे कोणत्याही पक्षाचे नसतात. त्यामुळे आम्ही त्यांना हा प्रकल्प नको म्हणून पत्र पाठवत आहोत. अजूनही ५० हजार पत्रे पाठवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शासन याबाबत काही ठोस पावले उचलत नसले, तरी मनसे बुलेट ट्रेनला कायम विरोध करत राहणार असल्याचेही त्यांनी शेवटी स्पष्ट केले.

आज ठाणेकरांशी चर्चा
ठाणे : मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे (एमएएचएसआर) म्हणजेच बुलेट ट्रेनसाठी ठाणे जिल्ह्यातील १९ हेक्टर जमिनीचा वापर होणार आहे. या जमिनीवरील वनसंपदेचे आयुर्मान वाढवण्यासाठी आवश्यक शास्त्रोक्त उपाययोजना करून पर्यावरणसंवर्धन व संतुलन राखण्याच्या दृष्टीने पर्यावरणतज्ज्ञांचे मार्गदर्शन व त्यावरील ठाणेकरांची मतेमतांतरे, प्रतिक्रिया समजून घेण्यासाठी राष्टÑीय हायस्पीड रेल निगमने (एनएचएसआरसीएल) ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये २९ मे ला पर्यावरणीय जनसल्लामसलत बैठकआयोजिली आहे. मात्र, जिल्ह्यातील २५० शेतकºयांची जमीन यात बाधित होणार असली, तरी या बैठकीत जमीन संपादनाविषयी कोणत्याही प्रकारची चर्चा होणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले. बुलेट ट्रेनच्या ५०८.१० किलोमीटरच्या मार्गापैकी जिल्ह्यातील मार्ग ३९.६६ किलोमीटर आहे. या मार्गाची रु ंदी १७.५ मीटर इतकी असून बीकेसीपासून ठाणे तालुक्यातील शीळपर्यंत २१ किलोमीटरचा मार्ग भूमिगत आहे. त्यापुढे मात्र ४८७ किलोमीटर म्हणजे अहमदाबादपर्यंत तो एलिव्हेटेड आहे. हा मार्ग जमिनीपासून १० ते १५ मीटर उंच असेल. या मार्गातील दोन खांबांतील अंतरही ३० मीटर इतके असणार आहे. या प्रवासादरम्यानच्या वनसंपदेवर संभाव्य धोक्यांविषयीच्या उपाययोजनांवर बैठकीत विचारविनिमय होणार आहे.
केंद्र सरकारच्या या बुलेट ट्रेन ठाण्याच्या खाडीतून ४० मीटर खोल बोगद्यातून जाईल. ठाणे परिसरात येताना ती ठाणे खाडी, कोपरखैरणे, सावली, घणसोली, महापे, अडवली, भुतवली अशी शीळपर्यंत भुयारी मार्गाने धावणार आहे.

Web Title: The MNS directly rescues the President for opposing the bullet train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.