उल्हासनगरात मनसेचे महावितरणच्या निषेधार्थ उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:43 AM2021-09-03T04:43:09+5:302021-09-03T04:43:09+5:30
उल्हासनगर : कॅम्प नं-४ मधील लालचक्की, संभाजी चौक, सुभाष टेकडी, मराठा सेक्शन परिसरातील विजेच्या लपंडावाच्या निषेधार्थ मनसेने गुरुवारी लाक्षणिक ...
उल्हासनगर : कॅम्प नं-४ मधील लालचक्की, संभाजी चौक, सुभाष टेकडी, मराठा सेक्शन परिसरातील विजेच्या लपंडावाच्या निषेधार्थ मनसेने गुरुवारी लाक्षणिक उपोषण केले.
शहरातील कॅम्प नं-४ येथील लालचक्की, संभाजी चौक, सुभाष टेकडी, मराठा सेक्शन परिसरात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होणे, वाढीव व चुकीचे बिल येणे, नागरिकांच्या तक्रारीची दखल न घेणे, या निषेधार्थ मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप गोडसे, समाजसेवक संजीव कांबळे यांनी लालगड येथील शाखेत हे उपोषण केले. महावितरण विभागाचे कार्यकारी अभियंता सावंत यांनी उपोषणस्थळी भेट देऊन तक्रारी व समस्या सोडविण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. यापूर्वी मनसेने महावितरण विभागाकडे तक्रारी, अर्ज देऊनही कारवाई न झाल्याचा आरोप संजीव कांबळे यांनी केला. महावितरण कंपनीने आश्वासन दिल्यानंतरही परिसरातील समस्या सुटल्या नाहीत तर पुन्हा उपोषणाचे हत्यार उपसावे लागेल. असा इशारा गोडसे यांनी दिला.