खड्डा बूजवून मनसेने केला प्रशासनाचा निषेध, मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 04:30 PM2018-07-15T16:30:24+5:302018-07-15T16:33:38+5:30

शुक्रवारी अनोखे आंदोलन छेडल्यावर रविवारी पुन्हा एकदा मनसेने खड्डा बूजवून प्रशासनाचा निषेध केला. 

 MNS has blamed administration, protesting against administration, large number of office bearers, activists involved | खड्डा बूजवून मनसेने केला प्रशासनाचा निषेध, मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी

खड्डा बूजवून मनसेने केला प्रशासनाचा निषेध, मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी

Next
ठळक मुद्देमनसेने खड्डा बूजवून प्रशासनाचा केला निषेध रस्तायवरुन ये - जा करणाºया नागरिकांच्या तक्रारी - हेमंत मोरेमोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी

ठाणे: शहरांतील खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या खड्ड्यांच्या समस्येप्रकरणी प्रशासनाचा निषेध नोंदविण्यासाठी पुन्हा एकदा मनसेने आंदोलन केले. आझादनगर येथील कोलशेत रोडवर जाणाऱ्या रस्त्यावर मनसेने खड्डा बूजवून प्रशासनाचा निषेध नोंदविला. 
     शुक्रवारी खड्डयात झोपून मनसेने अनोखे आंदोलन केल्यानंतर ठाण्यातील आझादनगर येथे पडलेले खड्डे बुजवून आंदोलन केले. आझादनगरवरून कोलशेत कडे जाणाºया रस्त्यावर वूल रिसर्च या कंपनी समोर वळण असलेल्या रस्त्यावर काही दिवसांपूर्वी एक दुचाकीस्वार खड्डा चुकवताना अपघात होऊन जखमी झाला होता असे अपघात होऊ नयेत म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखा अध्यक्ष हेमंत मोरे यांच्या नेतृत्वाखाली आझादनगर येथील रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवून प्रशासनाचा निषेध नोंदवण्यात आला. त्यावेळी प्रशासनाचा निषेध नोंदवण्यासाठी सोबत उपशाखा अध्यक्ष गणेश चव्हाण, उपशहर अध्यक्ष मनविसे प्रमोद पाताडे, प्रभाग अध्यक्ष वसंत लोखंडे, उपविभाग अध्यक्ष बाळू कांबळे, शाखा अध्यक्ष दत्तात्रय म्हेत्रे, शाखा अध्यक्ष संकेत वानखेडे, शाखा अध्यक्ष संदीप बेनगुडे व इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. या रस्तायवरुन ये - जा करणाºया नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेता हे आंदोलन केल्याचे हेमंत मोरे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. 

Web Title:  MNS has blamed administration, protesting against administration, large number of office bearers, activists involved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.