लुटमार करणाऱ्या तृतीयपंथींना मनसेने चोपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 01:45 AM2018-05-29T01:45:23+5:302018-05-29T01:45:23+5:30

शरीरविक्रयाचे आमिष दाखवून महामार्गावरील वाहनचालकांची लूट करणाºया तृतीयपंथींना रविवारी मध्यरात्री चोप देणारे मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, शहराध्यक्ष रवी मोरे यांच्यासह १५ ते २० जणांविरुद्ध कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

MNS has chased the third party looters | लुटमार करणाऱ्या तृतीयपंथींना मनसेने चोपले

लुटमार करणाऱ्या तृतीयपंथींना मनसेने चोपले

Next

ठाणे : शरीरविक्रयाचे आमिष दाखवून महामार्गावरील वाहनचालकांची लूट करणाºया तृतीयपंथींना रविवारी मध्यरात्री चोप देणारे मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, शहराध्यक्ष रवी मोरे यांच्यासह १५ ते २० जणांविरुद्ध कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या हल्ल्यात तिघे तृतीयपंथी जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.
भिवंडीतून ठाण्याकडे येणाºया नाशिक-ठाणे राष्टÑीय महामार्गाच्या कडेला उड्डाणपुलाच्या सुरुवातीला पाइपलाइनजवळील झुडुपात हे तृतीयपंथी अनैतिक व्यवसाय करतात. अनेकदा शरीरविक्रयाचे आमिष दाखवून ते या मार्गावरून जाणाºया ट्रकचालकांना लुटतात.
मनसेने यापूर्वीही या तृतीयपंथींच्या कारवाया थांबवण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, यात काहीच फरक न पडल्याने अखेर रविवारी रात्री जिल्हाध्यक्ष जाधव, शहराध्यक्ष मोरे यांच्यासह पाच ते सहा महिला कार्यकर्त्यांनीही अचानक आक्रमक पवित्रा घेऊन हे आंदोलन केले. झुडुपात मिळालेल्या या तीन तृतीयपंथींना घेराव घालून महिला कार्यकर्त्यांनीही चांगलाच चोप दिला. अचानक झालेल्या या हल्ल्यात तिघे तृतीयपंथी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे.
दरम्यान, याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात सुमारे २० कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, कोणालाही अटक केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

२०१६ मध्ये कापूरबावडी पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक बन्सी बारावकर यांच्या पथकाने याठिकाणी कारवाईसाठी पोलिसांचे पथक पाठवले होते. मात्र, १० ते १२ तृतीयपंथींच्या टोळक्याने पोलिसांवरच हल्ला केला होता. त्यातील काहींनी विवस्त्र होऊन पोलिसांसमोर बाका प्रसंग निर्माण केला होता.

Web Title: MNS has chased the third party looters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.