कचऱ्यात बसून मनसेचे महेश कदम यांचे आंदोलन; त्यानंतर ठाणे महापालिकेलाही आली जाग
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 12:45 PM2021-05-19T12:45:42+5:302021-05-19T15:49:46+5:30
ठाणे महापालिकेला सांगितले तर ते वृक्ष प्राधिकरण ची जबाबदारी असल्याचे सांगत आहे, वृक्ष प्राधिकरण उद्यान विभागाकडे ढकलत आहेत असे कदम यांनी सांगितले.
ठाणे : गेल्या तीन दिवसांपासून चंदनवाडी परिसरात ओला कचरा आणि झाडांचा पाला पाचोळा पडला असून अद्याप महापालिकेने तो कचरा उचलला नाही. ओला कचरा तीन दिवस तसाच पडून असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
ठाणे महापालिकेला वारंवार सांगूनही त्यांनी अद्याप हा कचरा उचलला नसल्याने बुधवारी या कचऱ्यात खुर्ची टाकून मनसेचे कोपरी पाचपाखाडी विभाग अध्यक्ष महेश कदम हे आंदोलन करत आहे. ठाणे महापालिकेला सांगितले तर ते वृक्ष प्राधिकरण ची जबाबदारी असल्याचे सांगत आहे, वृक्ष प्राधिकरण उद्यान विभागाकडे ढकलत आहेत असे कदम यांनी सांगितले.
महेश कदम यांच्या या आंदोलनानंतर ठाणे महापालिकेला जाग आल्याचे दिसून आले. महापालिकेचे कर्मचारीऱ्यांनी कचरा उचलल्याचे दिसून आले.