MNS Raj Thackeray Uttar Sabha Live : आता शरद पवार राऊतांवर खुश आहेत, ते कधी टांगले जातील हे समजणार नाही; राज ठाकरेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 09:33 PM2022-04-12T21:33:15+5:302022-04-12T21:34:14+5:30

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त केलेल्या भाषणात मी म्हटलं होतं. शरद पवार खुश झाले की भीती वाटायला लागते : राज ठाकरे

mns leader raj thackeray slams sanjay raut commented on sharad pawar ajit pawar supriya sule ed pm narendra modi | MNS Raj Thackeray Uttar Sabha Live : आता शरद पवार राऊतांवर खुश आहेत, ते कधी टांगले जातील हे समजणार नाही; राज ठाकरेंचा टोला

MNS Raj Thackeray Uttar Sabha Live : आता शरद पवार राऊतांवर खुश आहेत, ते कधी टांगले जातील हे समजणार नाही; राज ठाकरेंचा टोला

Next

"गुढीपाडव्याच्या भाषणानंतर काही प्रतिक्रिया आल्या. लाव रे तो व्हिडीओ म्हणणारे एका नोटीसीनं बदलतील याचं मला आश्चर्य वाटतं असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. एकाच घरात राहून अजित पवारांकडे रेड पडते, पण सुप्रिया सुळेंच्या घरी नाही, याचं कारण मला समजेल का?," असा सवाल राज ठाकरे यांनी केला. ठाण्यात आयोजित उत्तर सभेत राज ठाकरे यांनी अनेक नेत्यांवर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी राऊतांनाही टोला लगावला.

"एकाच घरात राहून अजित पवारांच्या घरी ईडीची रेड पडते आणि सुप्रिया सुळेंच्या घरी पडत नाहीत, याचे कारण काय. शरद पवार एकावर छापा पडला की दुसऱ्या माणसाचे नाव सांगायला पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतात. पुढचा माणूस कोण हे ते त्यांना सांगत असतील. देशमुख आत गेले पवारांनी भेट घेतली, अजित पवारांच्या नातलगांवर रेड पडली पवारांनी मोदींची भेट घेतली, राऊतांवर कारवाई झाली, पवारांनी भेट घेतली. पुतण्यावर ईडी कारवाई करते, आणि मोदींशी पवारांचे चांगले संबंध कसे काय," असे सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केले.

"शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त केलेल्या भाषणात मी म्हटलं होतं. शरद पवार खुश झाले की भीती वाटायला लागते. आज शरद पवार त्यांच्यावर खुश आहेत. त्यामुळे संजय राऊत हे कधी टांगले जातील हे कळणारही नाही," असं राज ठाकरे म्हणाले. यात अनेक काँग्रेसवाले गेलेत. मग उशिरा समजतं की तेव्हा ते बोलले होते, ते आज लागलंय, असंही त्यांनी सांगितलं.

Web Title: mns leader raj thackeray slams sanjay raut commented on sharad pawar ajit pawar supriya sule ed pm narendra modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.