मुख्यमंत्र्यांचा उठाव होता की ठराव, मनसेचे आमदार राजू पाटील यांचा सवाल
By अजित मांडके | Published: October 6, 2022 06:26 PM2022-10-06T18:26:22+5:302022-10-06T18:27:03+5:30
दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाषणादरम्यान बाप मुख्यमंत्री माझा मुलगा आणि नातू नगरसेवकाच्या तयारीत अशी टीका केली होती. मात्र असे कुणाच्याही घरापर्यंत जाणे चुकीचे असल्याचे मत मनसे आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केले आहे.
ठाणे :
दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाषणादरम्यान बाप मुख्यमंत्री माझा मुलगा आणि नातू नगरसेवकाच्या तयारीत अशी टीका केली होती. मात्र असे कुणाच्याही घरापर्यंत जाणे चुकीचे असल्याचे मत मनसे आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केले आहे. उद्धव ठाकरे यांच्या भाषणात बोलण्याच्या ओघात शब्द निघाले असतील. परंतु प्रतिउत्तर देताना मुख्यमंत्नी एकनाथ शिंदे यांनी दिलेली प्रतिक्रि या ऐकली तर त्यात मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, माझा नातू दीड वर्षाचा आहे. त्याचा जन्म झाल्यानंतर तुमचं अध:पतन सुरू झाले. मात्र मुख्यमंत्र्यांची ही दीड वर्षापासून प्लॅनिंग होती का? की हा उठाव होता की ठराव होता? असा सवाल उपस्थित केला आहे.
दसरा मेळाव्याची दोन्ही भाषणो आम्ही बघितली, परंतु त्यांच्याशी आमचा काही संबंध नाही, परंतु गर्दी आणि दर्दी नागरीक हे राज ठाकरे यांच्या पाडव्याच्या मेळाव्यातच दिसतात. राज ठाकरे यांच्याकडे ती ताकद असल्याचेही ते म्हणाले. सेनेचे जे दोन गट झालेले आहेत, त्यामुळे जे वातावरण तयार झाले किंवा राजकीय गोंधळ सुरू आहे. त्यामुळे मराठी माणूसच कुठेतरी गोंधळलेल्या परिस्थितीत असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु अशा लोकांना एकत्न आणण्याची ताकद फक्त राज ठाकरे यांच्याकडे आहे. राज ठाकरे यांच्याकडे अभ्यास आणि विचार आहेत.
महाराष्ट्रातील राजकारणात या चांगल्या गोष्टी नाही
काही लोक इव्हेंट साजरे करतात, काही लोक डोके मोजून मतदान करतात काही लोक खोके मोजून मतदान करतात. त्यामुळे लोकांनी यातून आता काहीतरी शिकले पाहिजे. मात्र राज्याच्या राजकारणासाठी हे चांगले संकेत नसल्याचे ते म्हणाले. एक मराठी माणूस म्हणून मला हे न पटणारे आहे.
दिवा भागात पुलाचे काम सुरू असल्याने तेथील काही लोक बाधित होत असल्याने तसेच पुलाच्या उतरण्याच्या दिशेला कुठलीही जोड (कनेटीव्हीटी) दिसत नाही. या संदर्भात गुरुवारी पाटील हे महापालिकेत आले होते. यावेळी त्यांनी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर व शहर विभागातील अधिका:यांची भेट घेतली. अधिका:यांना जर मुक्त हस्ते काम करण्याची संधी दिली तर अधिकारी काम करतात. परंतु जिथे मत मिळतात तेथेच कामे करा असे सांगितले गेले तर शहराची अवस्था वाईट होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे नवीन आयुक्तांनी अधिका:यांना मुक्त हस्तपणो काम करण्याची संधी दिली तर ठाणो देखील नवीमुंबईसारखे चांगले होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.