पहिली महिला महाराष्ट्र केसरी उपविजेती वैष्णवी पाटील हिला मनसे आमदार राजू पाटील यांनी दिली चांदीची गदा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2023 10:05 PM2023-03-26T22:05:18+5:302023-03-26T22:05:43+5:30
Kalyan: राज्यातील पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अंबरनाथ तालुक्यातील वैष्णवी पाटील ही उपविजेती ठरली. तिच्या या उत्तुंग भरारीबद्दल मनसेचे आमदार राजू पाटील यांनी रविवारी वैष्णवीची तिच्या मांगरूळ गावी घरी भेट घेत तिला चांदीची गदा भेट म्हणून दिली आहे.
- मुरलीधर भवार
कल्याण - राज्यातील पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अंबरनाथ तालुक्यातील वैष्णवी पाटील ही उपविजेती ठरली. तिच्या या उत्तुंग भरारीबद्दल मनसेचे आमदार राजू पाटील यांनी रविवारी वैष्णवीची तिच्या मांगरूळ गावी घरी भेट घेत तिला चांदीची गदा भेट म्हणून दिली आहे.
राज्यातील पहिली महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा नुकतीच सांगली इथं पार पडली. या स्पर्धेत अंबरनाथ तालुक्यातील मांगरुळ गावात राहणारी कुस्तीपटू वैष्णवी दिलीप पाटील हिने अंतिम फेरीत धडक मारली, ज्यात तिला उपविजेतेपद मिळालं आहे. यानंतर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असतानाच रविवारी मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी वैष्णवीची भेट घेत तिचं कौतुक केलं आणि मानाचा फेटा बांधून चांदीची गदा भेट म्हणून दिली.
वैष्णवीवर सध्या सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतोय.ठाणे जिल्हा आणि अंबरनाथ तालुक्याचे नाव राज्याच्या पहिल्या महिला कुस्ती स्पर्धेत वैष्णवीने प्रवेश करून ठाणे जिल्हा आणि श्री मलंगगड भागाचा नाव रोशन केल्याने मनसे आमदार राजू पाटील यांनी तिचे कौतुक केले आहे.यावेळी मनसेचे जिल्हा संघटक हर्षद पाटील, अंबरनाथ मनसे तालुका अध्यक्ष नकुल पावशे,तालुका सचिव अंबाजी भाग्यवंत यांसह ग्रामस्थ व वैष्णवीचे प्रशिक्षक देखील उपस्थित होते.