खड्यांच्या विरोधात मनसेचे आंदोलन

By अजित मांडके | Published: August 17, 2023 07:18 PM2023-08-17T19:18:33+5:302023-08-17T19:18:44+5:30

या आंदोलनाची दखल घेतली गेली नाही तर यापुढे तीव्र आंदोलन केले जाईल असा इशाराही मनसेच्या पदाधिका-यांनी दिला.

MNS movement against stones | खड्यांच्या विरोधात मनसेचे आंदोलन

खड्यांच्या विरोधात मनसेचे आंदोलन

googlenewsNext

ठाणे :  मुंबई गोवा महामार्गावर पडलेल्या खड्यांच्या विरोधात आंदोलन करा असे मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आदेश दिले असतांना गुरुवारी ठाण्यातही त्यांनी तशाच प्रकारचे आदेश दिल्यानंतर दुपार नंतर ठाण्यातील दोन ठिकाणी मनसेच्या पदाधिका-यांनी खड्यांविरोधात आंदोलन केले. या आंदोलनाची दखल घेतली गेली नाही तर यापुढे तीव्र आंदोलन केले जाईल असा इशाराही मनसेच्या पदाधिका-यांनी दिला.

ठाण्यात गुरुवारी शासकीय विश्रामगृह येथे मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी ठाणे, भिवंडी, कल्याण आदी भागातील रस्त्यांवर पडलेल्या खड्यांच्या विरोधात आंदोलन करण्याचे आदेश पदाधिकाºयांना दिले होते. त्यानंतर त्याचे पदसाद दुपारनंतर तत्काळ दिसून आले. नाशिक हायवे येथे लोढा, माजिवडा भागात रस्त्यांवर पडलेल्या खड्यांच्या विरोधात मनसेच उपशहर अध्यक्ष पुष्कराज विचारे यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले. यावेळी खड्यात झाड लावून त्या बाजूला रांगोळी देखील काढण्यात आली होती. तसेच तत्काळ खड्डे बुजविण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. मात्र खड्डे बुजविले गेले नाही तर यापेक्षाही अधिक तीव्र आंदोलन केले जाईल असा इशाराही यावेळी विचारे यांनी दिला.

दुसरीकडे खारेगाव येथील गणेश विद्यालय परिसरात खड्यांना पडलेल्या रस्त्यांच्या विरोधात देखील मनसेचे उप शहर अध्यक्ष सुशांत सुर्यराव यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले. यावेळी खड्यातून जा बाम लावा अशा घोषणा देत मनसेच्या पदाधिकाºयांनी येथून ये जा करणाºया वाहन चालकांना बामची बाटली देखील दिली. खड्यातून जातांना वाहन चालकांच्या पाठीत दुखणे, मानेला त्रास होतो. त्यामुळे ही बामची बाटली देण्यात आल्याची माहिती सुर्यराव यांनी दिली. तसेच खड्यातून तत्काळ मुक्तात द्या अन्यथा अधिकाºयांच्या टेबलावर खड्डे दिसतील असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानंतर प्रत्येक विधानसभा क्षेत्रात आंदोलन घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार हे आंदोलन करण्यात आले आहेत. परंतु तरी देखील प्रशासनाला जाग आली नाही तर मात्र यापेक्षाही तीव्र आंदोलन केले जाईल.
(रवि मोरे - शहर अध्यक्ष, मनसे, ठाणे)

Web Title: MNS movement against stones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे