सत्तेसाठी मनसे पालिका निवडणुकीत उरतणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 12:24 AM2019-11-06T00:24:16+5:302019-11-06T00:24:27+5:30

राजू पाटील : ठाणे, केडीएमसीतून श्रीगणेशा

MNS municipality will contest elections for power in thane | सत्तेसाठी मनसे पालिका निवडणुकीत उरतणार

सत्तेसाठी मनसे पालिका निवडणुकीत उरतणार

Next

ठाणे : मनसेचे राज्यातील एकमेव आमदार राजू पाटील यांनी महापालिकांच्या आगामी निवडणुकीमध्ये सत्तेत येण्यासाठीच पक्ष निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. विधानसभेमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी विरोधी पक्षात बसणार असल्याचे स्पष्ट केले असले तरी पालिका निवडणुकीमध्ये मात्र मनसे पूर्ण ताकदीने उतरणार आहे. त्यादृष्टीने त्यांनी काम सुरू केले असून मंगळवारी त्यांनी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांची भेट घेऊन त्यांच्या कल्याण ग्रामीण मतदारसंघात येत असलेल्या ठाणे महापालिका क्षेत्रातील तीन प्रभागाच्या समस्यांबत चर्चा केली. अशाच प्रकारची चर्चा कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्तांशीही त्यांनी केली.

विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मनसेने आपले उमेदवार उभे केले होते. एमवेळी निर्णय घेऊन हे उमेदवार उभे केले असल्याने त्यांना प्रचार करण्यासाठी कमी वेळ मिळाला. ठाणे शहर आणि कल्याण ग्रामीण या दोन विधानसभा क्षेत्रावरच मनसेची मदार होती. ठाणे शहर मतदारसंघातून जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांना उमेदवारी देण्यात आली होती. अगदी थोड्या फरकाने भाजपचे संजय केळकर यांनी जाधव यांचा पराभव केला. मात्र, कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रात प्रमोद (राजू) पाटील हे निवडून आले असून त्यामुळे ठाणे आणि कल्याण डोंबिल्वाली शहरांमध्ये मनसेची ताकद काही प्रमाणात का होईना वाढली आहे.

सक्रिय होण्याचे संकेत
च्पालिका निवडणुकांमध्ये सत्तेत येण्यासाठीच निवडणूक लढवणार असल्याचे राजू पाटील यांनी ठाण्यात येऊन जाहीर केले. ठाणे महानगरपालिकेच्या आगमी निवडणुकीत अधिक सक्रिय होणार असल्याचे संकेतच त्यांनी या माध्यमातून दिले आहेत.

Web Title: MNS municipality will contest elections for power in thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.